26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रयंदाही गोविंदा नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा

यंदाही गोविंदा नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) राज्यातील गोविंदा पथकांसोबत ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाचे सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत असे मुख्यमंत्री म्हणाले (The Chief Minister said that this year Dahihandi should not be celebrated).

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करण्याऐवजी जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊ. तसेच प्राण वाचविण्यासाठी आपण सण – वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवू, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘मौलिक’ सल्ला

भाजपाचे आमदार राम कदम यांनी कोरोनाचे नियम पाळू, पण दहीहंडी साजरी करणारच असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलन करायचे असेल तर कोरोनाच्या विरोधात करा. गेल्या वर्षी पासून जी लहान मुले अनाथ झालेली आहेत त्यांची काय अवस्था झाली आहे ते पहावे. लस घेऊनही अजून काही देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूयात मग सण साजरे होणारच आहेत (Once the crisis is over, festivals will be celebrated).

Chief Minister this year Dahihandi should not be celebrated
दहीहंडीऐवजी सामाजिक व आरोग्यविषक उपक्रम राबवावेत

मी आणि मुख्यमंत्री मित्र आहोत! देवेंद्र फडणवीसांचं प्रांजळ उत्तर

Set aside festivals for while, focus on health: Maharashtra CM Uddhav Thackeray to Dahi Handi organisers

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील बैठकीत उपस्थित होते.

Chief Minister this year Dahihandi should not be celebrated
दहीहंडी प्रेमीची निराशा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी