27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यCoronavirus : राज्यातील 17 ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण झाले बरे

Coronavirus : राज्यातील 17 ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण झाले बरे

Coronavirus चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

 

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ची लागण ( Coronavirus ) झालेल्या रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे चिंताही वाढली आहे. या चिंतेच्या वातावरणातही एक समाधानाची बाब घडली आहे. राज्यातील तब्बल 17 ‘कोरोना’ग्रस्त ( Coronavirus ) रूग्ण बरे झाले आहेत. औरंगाबाद येथील बऱ्या झालेल्या एका महिला रूग्णाला इस्पितळातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील १२ रूग्ण, पुणे व नागपूर येथील प्रत्येकी दोन रूग्ण बरे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, पुणे व नागपूर येथील रूग्णांच्या ताज्या चाचण्यांमध्ये ‘कोरोना निगेटिव्ह’ असा अहवाल प्राप्त झाला आहे. २४ तासानंतर आणखी दुसरी चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी सुद्धा निगेटिव्ह मिळाली तर ते पूर्ण बरे झाल्याचे मानले जाईल. त्यानंतर त्यांना काही दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयातील १२ रूग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पुण्यातील दोन्ही रुग्ण हे पती पत्नी आहेत. महाराष्ट्रातील पहिले ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण म्हणून ते आढळले होते. दुबईवरून ते आले होते. ‘कोरोना’ची ( Coronavirus ) लागण झाल्यामुळे त्यांना पंधरवड्यापूर्वी पुण्याच्या नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आहेत. सोमवारी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. या यशस्वी चाचणीबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक व्हिडीओ जारी केला असून समाधान व्यक्त केले आहे.

‘कोरोना’ग्रस्तांची संख्या १०१

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांच्या ( Coronavirus ) संख्येने आता शतक पार केले आहे. महाराष्ट्रातील एकूण ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या १०१ एवढी झाली आहे. यात मुंबई ३८, पिंपरी चिंचवड १२, पुणे १९, नवी मुंबई ५, सांगली ४, सातारा २ रूग्णांचा समावेश आहे.

ताज्या अपडेट मिळविण्यासाठी आमच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Lockdown : मुख्य सचिवांकडून अधिसूचना, 31 मार्चपर्यंत संचारबंदी

WHO : मास्क कधी वापरावा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी