30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजयुक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय विद्यार्थी परतले

युक्रेनमध्ये अडकलेले 250 भारतीय विद्यार्थी परतले

टीम लय भारी

नवी दिल्ली: युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थिती बघता तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान काल सकाळी 9 वाजता आले. यामध्ये एकूण 250 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी 18 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत.(250 Indian students stranded in Ukraine return)

 सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेश गंगा’ ही विशेष मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1940’ या विशेष विमानाने 250 विद्यार्थी काल सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत.

सायंकाळी सहा वाजता पुन्हा येणाऱ्‍या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत. युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्री सुभाष देसाईंची राष्ट्रपतींकडे मागणी

शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावरील अदानीचे नामफलक फोडले; संजय राऊतांकडून समर्थन

मुंबईत 2 मार्चपासून शाळा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू

10 Indian students from Ukraine return to Pune Sunday evening

 दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्य स्थळी पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी