26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : विद्यापीठांनो जागे व्हा ( डॉ. राजन वेळूकर )

Covid19 : विद्यापीठांनो जागे व्हा ( डॉ. राजन वेळूकर )

डॉ. राजन वेळूकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

This is a wake up call…

सध्या कोरोना ( Covid19 ) विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये देखील. काही विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत, तर काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

भारतासारख्या देशात अडचणी आहेत. पण शिक्षक प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. परीक्षा कधी होईल, होईल की नाही, कशा प्रकारे होईल, पेपर कधी तपासले जाणार, निकाल कधी लागणार, पुनर्मूल्यांकन कधी होणार असे सर्व प्रश्न या आपत्तीमध्ये ( Covid19 ) विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत. अशा वेळी त्यांच्याशी संवाद साधणे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक होऊन बसते.

Dhananjay Munde

मी सहज जगातील विविध विद्यापीठांचा अभ्यास केला तेव्हा या आपत्तीमध्येही  ( Covid19 ) तेथील विद्यापीठांचा त्यांच्या शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्याने संवाद सुरु आहे. असं करणं आवश्यकच आहे. तेव्हाच त्यांना वाटेल की विद्यापीठं आमची काळजी घेत आहेत. काही करतही असतील. पण आता त्यांना आश्वासित करण्याची गरज आहे.

खरतर, विद्यापीठे ज्ञान देण्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पुढील अंदाज बांधण्याचे अनेक विषय ते शिकवत असतात. आता पावेतो पुढील अंदाज बांधून निर्णय घेणं अपेक्षित होतं. आताही वेळ गेलेली नाही. विद्यापीठे स्वायत्त आहेत. त्यांना याबाबतीत शासनाच्या आदेशाची खरतर वाट बघण्याची गरज नाही असे मला वाटते.

अर्थात मी कोणाला सद्य परिस्थितीमध्ये घराबाहेर पडायला नाही सांगत. तेव्हा त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना निर्णय कळवायला पाहिजे. अनेक पर्याय आपल्या पुढे आहेत. पण त्वरीत निर्णय घेणे यावेळेस अपरिहार्य आहे.

व्यवस्थेवर, शिक्षकांवर तसेच विद्यार्थ्यांवर ताण पडेल असे कोणतेही निर्णय घेऊ नये. कारण पुढील शैक्षणिक सत्र सुरु करायचे आहे. ते जेवढे पुढे जाईल तेवढ्या अडचणी पुढील वर्षी वाढतील. त्यामुळे एक साखळी पुढेही सुरु राहील. जे आपल्याला परवडणार नाही. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. आपण दुसऱ्या राज्यांना दिशादर्शन करण्याची आवश्यकता आहे.

‘कोरोना’मुळे ( Covid19 ) आपल्या सर्वांनाच शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन – अध्यापन, विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीसाठीचे स्वातंत्र्य, मध्येच शिक्षणक्रम सोडण्याची संधी ( पण त्यांनी जेवढा शिक्षणक्रम पूर्ण केला आहे त्याचं प्रमाणपत्र त्याला मिळेल ), पुन्हा त्याला वाटेल तेव्हा तो परत येऊ शकेल, उद्योग क्षेत्राशी संबंध, रोजगार निर्माण करणारं, कौशल्याधिष्टित व क्षमता वर्धन समाविष्ट असलेला अभ्यासक्रम, जीवन शिक्षण इत्यादींचा समावेश असलेली शिक्षण पद्धती आणता येईल.

जास्तीत जास्त लवचिकता आज शिक्षण पद्धतीत गरजेची आहे. जो शिक्षक ज्या विद्यार्थ्याला शिकवतो त्याला त्याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार देणे कारण तोच त्याची दैनंदिन प्रगती बघत असतो. शिक्षकांनी, प्रशासकीय लोकांच सबलीकरण करायला पाहिजे. त्यांना सातत्याने प्रशिक्षित करणे, चांगल्या शिक्षकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना तयार करणे तसेच त्यांच्यावर जबाबदारी टाकणे अशा सारख्या अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे.

‘कोरोना’मुळे ( Covid19 ) एक संधी आली आहे. ही संधी पण हुकली तर मात्र आपली बस चुकेल. अनेक गोष्टी आहेत पण आतापूर्ती बस.

शेवटी एवढंच म्हणेल, THIS IS A WAKE UP CALL.

हे सुद्धा वाचा

coronavirus cure : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी..

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

नोटांमार्फत मुस्लीम कोरोनाचा प्रसार करीत असल्याची खोटी माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी