26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरक्रिकेटभारतानं मालिका गमावली पण कर्णधार रोहितनं 'दिल खुश कर दिया !'

भारतानं मालिका गमावली पण कर्णधार रोहितनं ‘दिल खुश कर दिया !’

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असतानाही हातावर पट्टी बांधून शेवटपर्यंत लढत राहिला, पण टीम इंडिया विजयापासून दूरच राहिली.

सध्या भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 3 वनडे आणि कसोटी मालिका खेळवली जात आहे. वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी (7 डिसेंबर) खेळवला गेला. या सामन्यांत भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे त्याआधी खेळवल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात देखील भारतीय संघ विजयापासून दूर राहिला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर आता भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. 2023साली भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात होती. अशा मालिकेत संघ पराभूत झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांची मने जिंकली. वास्तविक, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असतानाही हातावर पट्टी बांधून शेवटपर्यंत लढत राहिला, पण टीम इंडिया विजयापासून दूरच राहिली. भारतीय संघ हा सामना नक्कीच हरला, पण रोहित शर्माने चाहत्यांची मने जिंकली. यापूर्वी रोहित शर्मा दुखापतीमुळे नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

हे सुद्धा वाचा

कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवारांनी दिलेला अल्टिमेटम संपला; आज पत्रकार परिषद घेत जाहीर करणार वाटचाल

भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये मोहम्मद सिराज ‘नंबर 1’

विजय केंकरे शंभरीत ; ‘काळी राणी’ नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी सेंच्यूरी

रोहित शर्माने चाहत्यांची मने जिंकली
रोहित शर्मा फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडिया 207 धावांवर 7 विकेट गमावून संघर्ष करत होती, तर विजयासाठी 51 चेंडूत 65 धावांची गरज होती. भारतीय कर्णधाराने चाहत्यांना अपेक्षेप्रमाणे निराश केले नाही आणि 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. मात्र, या उत्कृष्ट खेळीनंतरही भारतीय संघ लक्ष्यापासून 5 धावा दूर गेला. वास्तविक, दुखापतीनंतरही रोहित शर्मा त्याच्या शानदार खेळीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. रोहित शर्माच्या खेळीबद्दल क्रिकेट चाहते सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

शेवटच्या षटकाचा थरार असा होता
भारतीय संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. त्यावेळी रोहित शर्मा स्ट्राईकवर होता, तर मुस्तफिजुर रहमानच्या हातात चेंडू होता. भारतीय कर्णधाराने पहिल्या दोन चेंडूत दोन चौकार मारले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याचवेळी टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची गरज होती, मात्र रोहित शर्माला चेंडू सीमापार पाठवता आला नाही. अशा प्रकारे बांगलादेशने हा सामना 5 धावांनी जिंकला. हा सामना जिंकण्यासोबतच यजमान संघाने मालिकेवरही कब्जा केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी