30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरराजकीयविधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

विधानसभा निवडणूक निकाल 2022 चा प्राथमिक कल हाती येत आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये भाजपची बहुमताकडे आघाडी दिसत आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस व भाजपात काट्याची टक्कर दिसत आहे. गुजरातमध्ये आपने प्रचारात केलेली हवा निकालांच्या कलात अजून उमटताना दिसत नाही.

विधानसभा निवडणूक निकाल 2022 चा प्राथमिक कल हाती येत आहेत. त्यानुसार, गुजरातमध्ये भाजपची बहुमताकडे आघाडी दिसत आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस व भाजपात काट्याची टक्कर दिसत आहे. गुजरातमध्ये आपने प्रचारात केलेली हवा निकालांच्या कलात अजून उमटताना दिसत नाही.

निकालाच्या बातम्या लाइव्ह अपडेट्स:

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतमोजणी सुरू आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

गुजरातमध्ये सलग सातव्या वेळी भाजाप सत्तेत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

हिमाचल प्रदेशात सुमारे चार दशकांपासून सातत्याने दिसणारा सत्ताविरोधी कल, यावेळी दिसेल का ही उत्सुकता कायम आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

भारतानं मालिका गमावली पण कर्णधार रोहितनं ‘दिल खुश कर दिया !’

कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवारांनी दिलेला अल्टिमेटम संपला; आज पत्रकार परिषद घेत जाहीर करणार वाटचाल

तमाम एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला मोठे बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानुसार, 182 पैकी भाजपाला 117 ते 151 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला फक्त 16 ते 51 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 77 जागा मिळवताना भाजपाच्या नाकीनऊ आणले होते.

हिमाचल प्रदेशमध्ये दोन एक्झिट पोलचा अपवाद वगळता इतर सर्व पोलनुसार, 68 सदस्यांच्या सभागृहात भाजप बहुमताचा आकडा गाठेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. दोन पोलने काँग्रेसला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्यावेळी भाजपने 44 आणि काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. एक जागा सीपीआय-एमकडे आणि दोन अपक्ष उमेदवारांना मिळाल्या होत्या.

आम आदमी पार्टीला या निवडणुकीतून राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रस्थापित करण्याची संधी मिळते की नाही, हे निकाल ठरवेल. राष्ट्रीय स्तरावर सध्या काँग्रेस दुबळी झालेली असताना भाजपला आव्हान देणारा पक्ष म्हणून आपकडे पाहिले जात आहे. कालच या पक्षाने दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. आप दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे. ते रिंगणात उतरल्याने गुजरातमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. आपने आक्रमक मोहीम राबविली, तरीही त्यांना गुजरातमध्ये 2 ते 13 जागा मिळतील, असा अंदाज आहे. गुजरातमध्ये सत्तेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे.

भाजपसाठी मुख्य आव्हान असलेल्या काँग्रेसची किती मते आप उमेदवार खातात, यावरून गुजरात निकालाचे अंतिम चित्र ठरेल. यावेळी काँग्रेस पक्ष पराभूत मानसिकतेतून लढला. सत्ताविरोधी रोष मतात परावर्तित करण्यात विरोधकांना यश मिळते की नाही, ते आजच्या अंतिम निकालांवरून दिसून येईल.

गुजरातमध्ये 27 वर्षांच्या कारकिर्दीनंतर भाजपविरोधात तीव्र सत्ताविरोधी भावना होती. बेरोजगारी, महागाई, राज्यातील ठराविक भागात पाणी न पोहोचणे, मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला न मिळणे, हे गुजरातच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकहाती पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. ‘ब्रँड मोदी’ची प्रतिष्ठाही त्यामुळे पणाला आहे. मोदींनी गुजरातमध्ये अनेक रॅली आणि मेगा रोड शो घेतले. गृहमंत्री शाह जवळपास दोन महिने राज्यात होते. प्रचार आणि निवडणूक रणनीतीचे व्यवस्थापन ते स्वतः करत होते. याशिवाय, गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हेही पहिल्या फळीतील नियोजनात होते. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा आणि प्रमोद सावंत यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील निवडणूक रॅलींना संबोधित केले. भाजपचे जवळपास सर्वच केंद्रीय मंत्री प्रचारात सहभागी झाले होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. तरीही गुजरातमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व केलेल्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्या दोन सभा घेतल्या. पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक रॅलींना संबोधित केले. मात्र, काँग्रेस प्रचारात संधी असूनही रंग भरले गेले नाही.

‘आप’साठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच महिन्यांत अनेक रॅली आणि रोड शो घेऊन आक्रमक प्रचार केला.

सध्या देशात काँग्रेसची सत्ता फक्त राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये आहे. या दोन्ही राज्यात निवडणुका 2023 मध्ये होतील. काँग्रेसला हिमाचल प्रदेशातून पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा आहे.

भाजपने उत्तर प्रदेश, गोवा, आसाम आणि उत्तराखंडमधील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताविरोधी प्रवृत्तीला तोंड देत तिथे सत्ता प्राप्त केली आहे. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्येही आपले सरकार पुन्हा येईल अशी भाजपाला आशा आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!