30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रिकेटपाकिस्तानला मोठा झटका ; रावलपिंडीमध्ये बॅन होणार इंटरनॅशनल क्रिकेट

पाकिस्तानला मोठा झटका ; रावलपिंडीमध्ये बॅन होणार इंटरनॅशनल क्रिकेट

रावळपिंडीच्या या खेळपट्टीबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात होत्या. खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी या खेळपट्टीला लाजिरवाणे म्हटले आहे. आता आयसीसीने दुसऱ्यांदा या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी दर्जा देऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अडचणीत आणले आहे.

सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानातील रावळपिंडी येथे खेळला गेला. या सामन्यात धावांचा महापूर आला होता. रावळपिंडीच्या या खेळपट्टीबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात होत्या. खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी या खेळपट्टीला लाजिरवाणे म्हटले आहे. आता आयसीसीने दुसऱ्यांदा या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी दर्जा देऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अडचणीत आणले आहे.

रावल पिंडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबू शकते
रावल पिंडीच्या या खेळपट्टीला आयसीसीने दुसऱ्यांदा डिमेरिट पॉइंट दिला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातही या खेळपट्टीला आयसीसीने डिमेरिट पॉइंट दिला होता. आयसीसीकडून सलग दोनदा डिमेरिट गुण मिळवणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी धोक्याचे ठरू शकते. जर हा डिमेरिट पॉइंट पाचवर पोहोचला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी या मैदानावर आयसीसीकडून 12 महिन्यांची बंदी घातली जाईल.

हे सुद्धा वाचा

रिझर्व बँकेने 13 कॉर्पोरेट बँकाना ठोठावला मोठा दंड

“भुरा”कार शरद बाविस्कर यांनी नाकारला राज्य सरकारचा वाङमय पुरस्कार; “फ्रॅक्चर्ड फ्रीडम”बाबत हुकूमशाही सरकारी मनमानीविरोधात सम्यक भूमिका!

G-20 च्या बैठकीमुळे मंबईतील रस्ते 16 डिसेंबर पर्यंत बंद; पाहा काय आहेत पर्यायी मार्ग

एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीचे अँडी पायक्रॉफ्ट या खेळपट्टीबद्दल म्हणाले, “ही अतिशय सपाट खेळपट्टी होती, जी कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजाला मदत करत नव्हती. हेच मुख्य कारण होते की फलंदाजांनी वेगवान धावा केल्या आणि दोन्ही संघांनी मोठी धावसंख्या उभारली. सामन्यादरम्यान खेळपट्टी फारच खराब झाली. गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही, त्यामुळे मला आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खेळपट्टी ‘सरासरीपेक्षा कमी’ असल्याचे आढळले.

विक्रमी धावसंख्या झाली
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी धावसंख्या झाली. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी आक्रमकता दाखवली. या संपूर्ण सामन्यात एकूण 1768 धावा झाल्या. कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी