27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्रिकेटवर्ल्डकपआधी भारताची अग्निपरीक्षा! आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत रंगणार वन-डे मालिका

वर्ल्डकपआधी भारताची अग्निपरीक्षा! आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत रंगणार वन-डे मालिका

क्रिकेट वर्ल्डकपला अवघे काही दिवस उरलेले असतानाच आजपासून (शुक्रवार, 22 सप्टेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. तीन सामन्याच्या या मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय फलंदाजीचा कणा समजला जाणाऱ्या विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात के एल राहूल कर्णधारपद भूषावणार असून ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा असेल. वर्ल्डकप तोंडावर असताना ठेवण्यात आलेल्या या मालिकेतून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

भारत ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मोहाली मधील आय एस बिंद्रा स्टेडियम मध्ये हा सामना खेळवला जाणार असून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलांडाज पॅट कमीन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहली शिवाय लेगस्पिनर कुलदीप यादव आणि तडाखेबाज ऑलराऊंडर हार्दिक पंड्या या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बिगहिटर ग्लेन मॅक्सवेल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

आशिया चषकांत दुखापतीमुळे सामने न खेळू शकलेल्या श्रेयस अय्यरला या मालिकेत तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी चांगली संधी आहे. त्याशिवाय, खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही वर्ल्डकपआधी स्वतःला सिद्ध करावे लागेल.

हे ही वाचा 

राजेशाही थाटाची डेक्कन ओडिसी तीन वर्षानंतर पुन्हा धावली!

3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

चक्क धावत्या लोकलमध्ये तरुणीचा बेली डान्स, पहा विडियो..

असा असेल भारतीय संघ
के एल राहुल (कर्णधार), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

असा असेल ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमीन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅशन एलिस, कॅमेरून ग्रीन, ॲडम झम्पा, मार्कस स्टाॅयनिस, मिशेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वाॅर्नर, जोश हेजलवूड, स्पेंसर जाॅनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शाॅर्ट.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी