32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयतेजस्विनी पंडित यांचा कुणावर रोष? ट्विटर व्हेरिफिकेशन काढण्यासाठी राजकीय दबाव?

तेजस्विनी पंडित यांचा कुणावर रोष? ट्विटर व्हेरिफिकेशन काढण्यासाठी राजकीय दबाव?

अभिनेत्री तेजस्विनी पंडित कालपासून आक्रमक झाल्या आहेत. आता तर त्यांनी नवा दावा केला आहे. त्यांच्या X म्हणजेच ट्विटर अकाउंटचे व्हेरिफिकेशन राजकीय दबावामुळे काढल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. काल तेजस्विनी पंडित यांनी टोलसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी काय बोलले होते, ते ट्वीट करून राजसाहेब आता तुम्हीच या टोलधाडीतून वाचवा, असे ट्वीट केले होते. त्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत तेजस्विनी पंडित यांनी ‘कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!’ असा टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी रविवारपासून पुन्हा एकदा टोलविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यात केवळ मोठ्या व्यावसायिक वाहनांकडून टोल वसूल केला जातो, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर तेजस्विनी पंडित यांनी त्याचे वक्तव्य ट्विटरवरून शेअर केले होते.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी आज नेमकी ट्वीट करत काय टीका केली आहे, पाहुया,

कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!

माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्ही जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली, असा वाटणार प्रश्न उपस्थित केला म्हणून?

पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कुणीही असला तरी आम्ही जनता आहोत. जेव्हा जेव्हा आमची पिळवणूकक होील, दिशाभूल होईल तेव्हा आमचा दुमदूमणारच आहे.

यावरून नेटकऱ्यांनी तेजस्विनी पंडित यांना चांगलेच ट्रोल केले आहे. त्या लोकांची नावे जाहीर करा उगाचच हवेत गोळ्या मारू नका. कारण ट्विटर व्हेरिफिकेश विकत मिळते, तो काही सन्मान राहिलेला नाही. अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. एवढेच नाही तर व्हेरिफिकेशन राजकीय कारणामुळे काढले जात नाही, तुम्ही X कडे तक्रार करा, अशाही सूचना काही नेटकऱ्यांनी केल्यात. तर काहींनी राजकारणात यायचे असेल तर सरळ या, असा दंगा करून काय साध्य होणार, असा थेट सवाल तेजस्विनी पंडित यांना केला आहे.

हे ही वाचा

टोलनाक्यांवरून राज ठाकरेंकडून फडणवीसांची ‘नाकाबंदी’

…अन्यथा टोलनाके जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

तेजस्विनी पंडित काल काय म्हणाल्या होत्या?

तेजस्विनी पंडित काल (९ ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस टोलसंदर्भात काय बोलले होते याचा व्हिडीओ शेअर करत, ‘म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!, असे ट्वीट केले होते. असो, टोलवसुली प्रकरणावरून आता राज ठाकरेंसोबतच अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील आक्रमक झाल्या आहेत, एवढे नक्की.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी