27 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्रिकेट‘विराट’खेळी करत कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 वे शतक

‘विराट’खेळी करत कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 वे शतक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शनिवारी (12 डिसेंबर) बांग्लादेश विरुध्दच्या वनडे क्रिकेट सामन्यात तुफान खेळी करत नवा विक्रम केला आहे. तब्बल 40 महिन्यांनतर वनडे मधील शतकी खेळी करत आपल्या कारकिर्दीतील 72 वे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतक झळकवले. तर वनडेमधील 44 वे शतक पूर्ण केले. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. त्यानंतचर भारताचा डाव सावरण्याचे आवाहन विराट कोहली आणि ईशान किशनच्या खांद्यावर होते. त्यावेळी ईशान किशनने शानदार द्विशतक झळकावले. आणि विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली.

विराट कोहलीने नवा विक्रम करत आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉँटिगचे रेकॉर्ड मोडले आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्ये विक्रमी शतके करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात 85 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 1 षटकार मारत आपले शतक झळकविले.

गेल्या वर्षी कोरोनाच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यात येत नव्हते. त्याधी सचिन तेंडूलकरने रचलेला 100 शतकांचा विक्रम विराट कोहली आरामात मोडीत काढेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शतकांना ओहोटी लागली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 1000 दिवस कोहलीच्या नावावर एकही शतक नव्हते. त्यानंतर तब्बल 1091 दिवसांनी विराट कोहलीने टी20 सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वे आणि टी20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. त्यानंतर विराट कोहबली पुन्हा जुनम्या फॉर्मात परतल्याच्या चर्चांना सुरुवता झाली.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषकांत भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला. मात्र, या संपूर्ण विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिकत धावा करणारा फलंदाज विराट कोहली होता. त्याने वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध तुफानी 82 धावांची खेळी करत सर्वांना चकित केले होते. त्यानंतर आता बांग्लागदेश विरुद्ध शतक झळकावत विराटने पुन्हा एकदा सचिन तेंडूलकरच्या 100 शतकांच्या विक्रमाला आव्हान दिले आहे. आणि आगामी काळात तो हा विक्म मोडीत काढेल अशा चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा
ईशान किशनने रचला इतिहास; डबल सेंच्युरी करुन दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

बीसीसीआयच्या निवडसमितीच्या अध्यक्षपदी व्यंकटेश प्रसाद ?

बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात होणार मोठे बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरची सर्वाधिक शंभर शतके आहेत, त्यानंतर आता दुसऱ्यास्थानावर विराट कोहली असून त्याच्या नावावर आता 72 शतके आहेत. तर रिकी पाँटिंगच्या नावावर 71 शतके आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये देखील सचिन तेंडूलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिनच्या नावावर 49 शतके असून विराटच्या नावे आता 44 शतके आहेत, विराट वनडे क्रिकेटमध्ये आता दुसऱ्यास्थानावर असून रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे रिकीच्या नावावर 30 शतके आहेत. तर चौथ्या स्थानावर रोहीत शर्मा असून त्याच्या नावावर 29 शतके आहेत.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!