28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्राईमGautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी...

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) हिचा चेंजिंग रुममधील खासगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाला आहे. गौतमी पाटील हिच्याबाबत व्देषापोटी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने असे संतापजनक कृत्य केल्याने त्याविरोधात मोठा असंतोष व्यक्त केला जात आहे. एखाद्या महिलेला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्यातच वारकरी सांप्रदायातून देखील या प्रकरणी निषेध व्यक्त केला जावू लागला आहे.  वारकरी सेवा फाऊंडेशनचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज माने (Shubham Maharaj Mane) यांनी याप्रकरणी आळंदी पोलिसांना (Alandi Police) अर्जाव्दारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Dancer Gautami Patil Viral video Shubham Maharaj Mane Demand to Alandi Police File Case)

ह.भ.प. शुभम महाराज माने यांनी आळंदी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना याप्रकरणी अर्ज लिहीला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या दोन तीन दिवसांपासून सातत्याने सोशल मीडिया, प्रसार माध्यमांवर नुकतेच खान्देश कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या तसेच महाराष्ट्र कन्या तसेच लावणीसाम्राज्ञी गौतमीताई पाटील यांचा एक कपडे बदलण्याचा विडियो अज्ञात व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल केला/ झाला आहे. मात्र या महाराष्ट्र कन्येला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तिच्या समर्थनार्थ तीचा हा भाऊ तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत आहे. तीला या आधीही बदनाम करण्याचा विचार सबंध कलासृष्टितून केला जात आहे. त्यामुळे वारकरी सेवा फाऊंडेशन अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्ष हभप शुभम महाराज माने यांच्या कडून आळंदि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, अशी मागणी आळंदी पोलिसांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

कौतुकास्पद : वानखेडेत होणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा..!

TAIT Exam : विवाहित महिला उमेदवाराला परीक्षेपासून ठेवले वंचित; राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

नृत्यांगना गौतमी पाटील हिचा पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान चेंजिग रुममध्ये कपडे बदलतनाचा अज्ञात व्यक्तीने चोरुन व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्या एका सहकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी भादवी कलम 354-सी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच राज्य महिला आयोगाने देखील या प्रकरणी गंभीर दखल घेतलेली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले असल्याचे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले होते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी