27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeक्राईमअपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात अपघातग्रस्त युवक उपचारासाठी दुचाकी घटनास्थळी सोडून रुग्णालयात गेला अन् चोरट्याने नेमकी हीच संधी साधून अपघातस्थळी असलेली दुचाकीच चोरून नेली.यामुळे अपघातग्रस्त युवकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले असून, त्याने नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. अजिंक्य सुभाष घोडेराव (रा. शहा, ता. सिन्नर) याच्या फिर्यादीनुसार, तो मध्यरात्री कन्या कोठारी शाळेमागील रस्त्याने दुचाकीवरून जात होता.

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात अपघातग्रस्त युवक उपचारासाठी दुचाकी घटनास्थळी सोडून रुग्णालयात गेला अन् चोरट्याने ( Thief ) नेमकी हीच संधी साधून अपघातस्थळी असलेली दुचाकीच चोरून ( Thief ) नेली.यामुळे अपघातग्रस्त युवकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले असून, त्याने नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. अजिंक्य सुभाष घोडेराव (रा. शहा, ता. सिन्नर) याच्या फिर्यादीनुसार, तो मध्यरात्री कन्या कोठारी शाळेमागील रस्त्याने दुचाकीवरून जात होता.(Driver hospitalized after crash; The thief snatched the bike)

भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या वडाच्या झाडाजवळ घसरून अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती.त्यामुळे त्याने दुचाकी तिथेच सोडून उपचारासाठी रुग्णालय गाठले. याच संधीचा चोरट्याने फायदा घेत अजिंक्यची दुचाकी (एमएच ४७, आर ७३५६) आणि घटनास्थळी पडलेला मोबाईल चोरून नेला. अजिंक्यने उपचारानंतर सोमवार (ता. २९) पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार भोळे तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी