अनधिकृतरित्या तलवार < sword >बाळगणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. यामध्ये एका संशयिताला आडगाव गुन्हे शोध पथकाने तर दुसऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून दोन तलवारी जप्त
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित रोहीत नवनाथ राऊत रा. मेडीकल कॉलेज हॉस्पीटल समोर, राउत मळा, आडगांव नाशिक याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली आहे. हि कारवाई युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पो. हवा धंनजय शिंदे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, समाधान पवार यांनी केली आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये सोमवारी (दि.१८) रोजी आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घालत असतांना पोलीस अमलदार दिनेश गुंबाडे आणि इरफान शेख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, निलगीरी बाग परिसरात संशयित राजेंद्र नाना पवार, (२२, रा. बिल्डींग नं. ३, रूम नं. १७, निलगीरी बाग, यश लॉन्स समोर, नाशिक) हा तालावर घेऊन येणार आहे. माहिती मिळताच परिसरात सापाला रचून सांसहित राजेंद्र पवार याला एका धारदार तलवारीसह ताब्यात घेण्यात आले आहे. हि कारवाई आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रवीण दाइंगडे, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, शिवाजी आव्हाड, देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस नाईक निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे, इरफान शेख यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी, डिझेल चोरी, मोबाईल चोरी, लग्नासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांवर डल्ला अशा गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर आडगाव पोलीस थातुर मातुर कारवाई करून त्याची प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आडगांव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस सुस्त असल्याने गुन्हेगार मस्त झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहे.
आडगाव मध्ये तलवार घेऊन दहशत करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या युनिट एकचे कर्मचारी आवळतात तसेच, एमडी ड्रग्स सारख्या प्रकरणातील गुन्हेगारांना देखील गुन्हे शाखेचे कर्मचारी रंगेहाथ अटक करत आहे. मात्र, त्याचे कुठलेच सोयरसुतक आडगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहे. त्यामुळे या आडगाव पोलीस ठाण्याला सक्षम आणि दबंग अधिकारी देण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे.