32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeक्राईमपावणेचार कोटीचे सोने लुटणारे अखेर अटकेत

पावणेचार कोटीचे सोने लुटणारे अखेर अटकेत

कुरियर सर्व्हिसच्या वाहनास अडवून तिघांना शस्त्राचा धाक दाखवून एका टोळीने अडीच किलो सोने व १३५ किलो चांदी लुटून नेली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करीत उत्तरप्रदेशमधील आग्रा येथून पाच जणांना अटक केली आहे.या संशयितांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कुरियर सर्व्हिसच्या वाहनास अडवून तिघांना शस्त्राचा धाक दाखवून एका टोळीने अडीच किलो सोने व १३५ किलो चांदी लुटून नेली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करीत उत्तरप्रदेशमधील आग्रा येथून पाच जणांना अटक केली आहे.या संशयितांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांमध्ये तीन माजी सैनिकांचा सहभाग आढळून आला आहे.

देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार (३३), आकाश रामप्रकाश परमार (२२, दोघे रा. ता. खेरागड, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश), हुबसिंग मुल्लासिंग ठाकूर (४२, रा. चेंकोरा, राज्यस्थान), शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर (४५) व जहिर खान सुखा खान (५२, रा. ता. खेरागड, जि. आग्रा) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेगाव येथून १८ जानेवारीला मुंबईतील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या कारमधून तिघे जण मुंबई ते नाशिक असे सोन्याचांदीच्या दागिन्यांचे कुरीअर नेत होते. त्यावेळी दोन कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी कुरीअर वाहन अडवून वाहनातील तिघांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकली होती. त्यानंतर शस्त्राच्या बळावर दरोडेखोरांनी वाहनातील ३ कोटी ७५ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन दिवस केला त्यांचा पाठलाग

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करीत होते. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व विनोद पाटील यांनी प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनानुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दरोडेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण, भौतिक पुराव्यांच्या आधारे दरोडेखोर उत्तरप्रदेशमधील आग्रा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस आग्रा येथे गेले. तेथे तीन दिवस पाळत ठेवून पोलिसांनी पाच जणांना पकडले. त्यात दोन माजी सैनिकांचाही समावेश आहे. या संशयितांनी दरोड्यातील दागिने जमीनीत गाडून ठेवले होते. सखोल तपासात पोलिसांनी अडीच किलो सोने व ४५ किलो चांदीचे दागिने आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील संशयित सतेंदरसिंग यादव (रा. भोजपूर, जि. आग्रा) या माजी सैनिकासह दालचंद गुर्जर (रा. खेरागड, जि. आग्रा)व नंदु गारे (रा. ता. चांदवड, जि. नाशिक) हे संशयित फरार आहेत.

तपासी पथकाला मिळाले तब्बल २५ हजारांचे बक्षीस

सहायक निरीक्षक संदेश पवार, गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, सागर काकड, शांताराम घुगे, योगेश पाटील, सुधाकर बागुल, नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, शिपाई नौशाद शेख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. तपासी पथकास पोलिस अधीक्षक उमाप यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी