32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeएज्युकेशनमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्रजासत्ताक दिन

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमामध्ये याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी      श्री. एन. व्ही. कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचे जागतिक स्तरावर नावलौकिक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. समाजात वावरतांना एकोप्याने रहावे तसेच सर्वांना मदत करावी. परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यापीठाचा परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यात आला असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव श्री. मिलिंद देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी