29 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरक्राईमतीन विद्यार्थिनींना भरधाव कारने दिली धडक; एक विद्यार्थिनी कोमात

तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने दिली धडक; एक विद्यार्थिनी कोमात

दिल्लीत एका कारने तरुणीला धडक देत १२ किलोमीटर फरफटत नेल्याची घटना ताजी असतानांच एनसीआर ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने धडक (Hit speeding car) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनी बी.टेकचे शिक्षण घेत होत्या. तीघींपैकी एका विद्यार्थिनी (students accident) कोमात गेली असून स्वीटी कुमारी असे या मुलीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर दोन विद्यार्थिनी देखील जखमी झाल्या आहेत. स्वीटी कुमारीवर ग्रेटर नोएडातील एका रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

स्वीटी कुमार ही बी. टेक च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. ती मुळची बिहारची रहिवासी आहे. तर अपघातात जखमी झालेली हरसोनी डोडा ही अरुणाचल प्रदेशची रहिवासी आहे. तर अपघातात जखमी झालेली शारदा युनिवर्सिटीमध्ये शिकणारी तीसरी विद्यार्थिनी अजनबा ही मणिपुरची रहिासी आहे. या तीघी ही ३१ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सेक्टर अल्फा २ बसस्थानकापासून सेक्टर डेल्टाकडे जात होत्या. त्याचवेळी एका भरधाव कारने या तिघींना जोरदार धडक दिली त्यानंतर कारचालक कारसह भरधाव वेगात निघून गेले. या अपघात प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी एनसीआर ग्रेटर नोएडामध्ये बेटा-2 पोलिस ठाण्यात फिर्यात दाखल केली असून पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्वीटी कुमारी हिचा भाऊ संतोष कुमार याने समाज माध्यमातून मदतीची विनंती केली आहे. स्वीटी ही नोएडामधील जीएनआयओटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे, ती आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने म्हटले आहे की, मी स्वीटीच्या उपचारासाठी निधी उभारत आहे, कारण तिचा मोठा अपघात झाला आहे. तिच्यावर सध्या ग्रेटर नोएडा येथील कैलाश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही आतापर्यंत एक लाख रुपये तीच्या उपचारासाठी खर्च केले आहेत. मात्र पुढील उपचारांसाठी आणखी १० लाख रुपये खर्च येईल, असे संतोष याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

 हे सुद्धा वाचा

गुजराती वरवंटा : महाराष्ट्रातील दोन लोकप्रतिनिधींचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार, निमंत्रण पत्रिका मात्र गुजरातीमध्ये !

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; अजित पवार यांचे खास ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू साथीदार!

ऑनलाईन गेमिंगमधील सट्टेबाजी, व्यसनाधीन करणारा तसेच लैंगिक कंटेटला बसणार चाप; केंद्र सरकारचे नवे धोरण लवकरच

दरम्यान स्वीटीसोबत शिकाणारे काही विद्यार्थी देखील तीच्या उपचारासाठी आर्थिक मदत उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत मदत स्वरूपात एक लाख रुपये जमा झाले आहेत. मात्र तीच्या रुग्णालयातील उपचारांचा दररोजचा खर्च तब्बल दोन लाख रुपये असल्याचे देखील त्यांनी सांगितले. स्वीटीच्या घरची आर्थिकस्थिती बेताची असून तीचे वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करतात अशी माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान अपघात होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांना अद्याप आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. मात्र लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!