25 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रविश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

महाराष्ट्रात राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या विदर्भाचे स्थान महत्वाचे आहे. पण असे असतानाही पहिल्या विश्व मराठी संमेलनात  (vishwa marathi sammelan) विदर्भाला डावलून  एक प्रकारे मुंबईतून विदर्भाला हद्दपार (Vidarbha eliminated) करण्यात आल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत वैदर्भीयांनावर अन्याय होत असल्याची खंत अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांनी व्यक्त केली आहे. याबाबत पाठक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे ई-मेलद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी मुंबईत तीन दिवस मराठी भाषेचा जागर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत ४,५ आणि ६ जानेवारी रोजी ”मराठी तितुका मेळवावा” या हेतूने हे पहिले विश्व मराठी संमेलन सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित करण्यात आले आहे. मात्र, संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच या महोत्सवाला वादाचे गालबोट लागले आहे. या संमेलनात वैदर्भीयांनाचा सहभाग दिसत नसून वैदर्भीयांनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी आग्रही मागणी पाठक केली आहे. विदर्भ ही पुरातन काळापासून सारस्वतांच्या भूमी राहिली आहे. सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात विदर्भातील अनेक नररत्नांनी जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटविला आहे. मात्र तरीदेखील विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलण्यात आल्याचे पाठक यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

‘मराठी तितुका मेळवावा’ मुंबईत मराठीचा डंका; वरळीत रंगणार विश्व मराठी संमेलन

गुजराती वरवंटा : महाराष्ट्रातील दोन लोकप्रतिनिधींचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार, निमंत्रण पत्रिका मात्र गुजरातीमध्ये !

ऑनलाईन गेमिंगमधील सट्टेबाजी, व्यसनाधीन करणारा तसेच लैंगिक कंटेटला बसणार चाप; केंद्र सरकारचे नवे धोरण लवकरच

शिष्टमंडळास भेटण्यास केसरकरांचा नकार

यापूर्वीदेखील वाङ्मय पुरस्काराच्या वितरणात विदर्भावर अन्याय झाल्याचे सांगत अविनाश पाठक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे वेळ मागितली होती. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे. राज्याला विदर्भाचेच उपमुख्यमंत्री लाभले असताना विदर्भावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यामुळे याला राजकीय रंग येण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर पहिले विश्व मराठी संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!