30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईमप्रचार करायचा असेल तर खंडणी दे ; दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रचार करायचा असेल तर खंडणी दे ; दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

आमच्या भागात निवडणूक प्रचार करायचा असेल तर, २१ हजारांची खंडणी द्यावी लागेल’ असे म्हणत सराईत गुंडांनी एकनाथ शिंदे गटाच्या उपमहानगरप्रमुखास धमकावल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड येथे घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी दाखल फिर्यादीनुसार खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करुन मुख्य सूत्रधारास अटक केली आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश पेखळे(रा. मोरेमळा, जेलरोड) आणि विशाल चाफळकर(रा. महाजन हॉस्पिटलमागे, पेंढारकर कॉलनी, जेलरोड) अशी सराईत संशयितांची नावे आहेत. यातील पेखळे हा सूत्रधार असून त्यास अटक करण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे

आमच्या भागात निवडणूक प्रचार करायचा असेल तर, २१ हजारांची खंडणी द्यावी लागेल’ असे म्हणत सराईत गुंडांनी एकनाथ शिंदे गटाच्या उपमहानगरप्रमुखास धमकावल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड येथे घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी दाखल फिर्यादीनुसार खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (case registered) करुन मुख्य सूत्रधारास अटक केली आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश पेखळे(रा. मोरेमळा, जेलरोड) आणि विशाल चाफळकर(रा. महाजन हॉस्पिटलमागे, पेंढारकर कॉलनी, जेलरोड) अशी सराईत संशयितांची नावे आहेत. यातील पेखळे हा सूत्रधार असून त्यास अटक करण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाचे(If you want to campaign, pay a ransom ; A case has been registered against two suspects.)

नाशिकमधील उपमहानगरप्रमुख शिवाजी लहू ताकाटे (रा. ज्ञानेश्वरनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते (दि. २०) रोजी जेलरोड येथील कुबेर कॉर्नरमधील शॉपमध्ये होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासह शिंदे गटाच्या उमेदवाराचा जेलरोड व आदी भागात प्रचार करण्याच्या दृष्टीने नियोजन करत असतांना पेखळे व चाफळकर तेथे आले. यानंतर संगनमत करुन दोघांनी ताकाटे यांच्याशी वाद घालून ‘आमच्या मोरेमळा भागात लोकसभा उमेदवाराचा निवडणूक प्रचार करायचा असेल तर, एकवीस हजार रुपये रोख खंडणी द्यावी लागेल’ असा दम दिला.यानंतर दोघांनी धारदार शस्त्रे दाखवून ताकाटे यांना शिवीगाळ केली.

दरम्यान, या घटनेनंतर ताकाटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना घटनेची माहिती कळताच पुढील कार्यवाहीचे आदेश सहायक निरीक्षक सुकदेव काळे व कोरडे यांना दिले. एकीकडे ताकाटे फिर्याद नोंदवित असतानाच नाशिकरोड पोलीसांनी संशयित खंडणीबहाद्दर पेखळे यास ताब्यात घेत अटक केली. तर, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. तपास एपीआय काळे करत आहेत.

फायरिंग, प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे

चाफळकर बंधूंची गँग जेलराेड परिसरात गुंडगिरीसाठी कुप्रसिद्ध आहेत. नागरिकांना धमकावणे, फेरीवाल्यांची गाड्या उलथून टाकणे, गाेळीबार करुन प्राणघातक हल्ला करणे यांसह हातगाड्या जाळणे, कट्टे, चाॅपर बाळगणे असे गंभीर गुन्हे चाफळकर गँगवर दाखल आहेत. ते जामीनावर असून यातील पेखळे हा अवैधरित्या देशी व विदेशी दारु विक्री करताे. त्याच्यावर दारुबंदीचे व इतर गंभीर अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पेखळे ही गँग ऑपरेट करत असून चाफळकर हा त्याचा पंटर आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी