33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा यात्रा उत्साहात

नाशिक उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा यात्रा उत्साहात

नंदिनी नदीच्या तिरावर असलेल्या उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा महाराजांची दोन दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दरम्यान यात्रेच्या समाप्तीनिमित्त २१ अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली होती. यावेळी नाशिक शहरासह जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच परराज्यातुन पैलवानांनी हजेरी लावली होती. अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने दिनांक २० आणि २१ एप्रिल रोजी सिटी सेंटर मॉल नजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिरच्या प्रांगणात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या मंदिराच्या माध्यमातुन पुर्वापार चालत असलेली यात्रेची परंपरा आजतागायत जोपासली जात आहे.

नंदिनी नदीच्या तिरावर असलेल्या उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा महाराजांची (Mhasoba Maharaj) दोन दिवसीय यात्रा (yatra) मोठ्या उत्साहात पार पडली. दरम्यान यात्रेच्या समाप्तीनिमित्त २१ अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली होती. यावेळी नाशिक शहरासह जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच परराज्यातुन पैलवानांनी हजेरी लावली होती. अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने दिनांक २० आणि २१ एप्रिल रोजी सिटी सेंटर मॉल नजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिरच्या प्रांगणात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या मंदिराच्या माध्यमातुन पुर्वापार चालत असलेली यात्रेची परंपरा आजतागायत जोपासली जात आहे. (The yatra of the ancient Mhasoba Maharaj at Nashik Untwadi was carried out with great enthusiasm)

या ठिकाणी होणा-या यात्रेमध्ये उंटवाडीसह मोरवाडी,अंबड,पाथर्डी,वडनेर ,सातपुर पिंपळगाव खांब, गौळाणे ,दाढेगाव आदी भागातुन पुर्वीच्याकाळात बैलगाडीतुन भाविक यात्रेसाठी येत होते. मात्र काळानुसार बदल झाला असला तरी यात्रोत्सव पूर्वीसारखाच आजही कायम आहे प्रारंभी अतिप्राचीन म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त दिनांक २०एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पंच कमेटीच्या हस्ते श्रीं चे अभ्यंगस्नान आणि दुग्धाभिषेक करण्यात आले तर सकाळी ९वाजता महापुजन आणि तळी भरण्यात दुपारी१२ वाजेपासुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच सकाळी १०वाजेपासून होमियोपँथी तज्ञ डॉ चारुशिला गवळी नाईक आयोजीत मोफत सर्व रोग निदान शिबीर त्याचप्रमाणे रक्तदानशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी जादुचे प्रयोग तसेच जागरण गोंधळाचाही कार्यक्रम घेण्यात आला होता मंदिराच्या प्रांगणात विविध खाद्यपदार्थ तसेच लहान मुलांसाठी खेळणीचे स्टॉल लावण्यात आले होते. तर रात्री उशिरापर्यंत भाविकांनी म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती

तर दिनांक २१रोजी दुपारी ३वाजता कुस्त्यांची दंगल झाली यावेळी नाशिक शहरासह जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच परराज्यातुन पैलवानांनी हजेरी लावली होती यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके,माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, माजी नगरसेवक आण्णा पाटील, दत्ता पाटील ,बाजीराव तिडके, विलास जगताप, दिनकर तिडके, विष्णु जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाढवे, सुरेश जगताप, बाळासाहेब तिडके, संतोष कोठावळे,प्रविण तिडके , राम पाटील अमोल तिडके, दत्तात्रेय तिडके, अँड संदिप फडतारे आदींनी परिश्रम घेतले यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी