31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवीली

नाशिक मनपाने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवीली

सोमवारी साजरी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभुमीवर आज मनपाच्या अतिक्रमण विभागाने सुट्टी असूनही शहरातील मेनरोडसह भद्रकाली आदी भागात विशेष अतिक्रमण मोहीम राबवून मिरवणूक मार्ग मोकळा केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. अतिक्रमण कारवाईत सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी योगेश रकटे व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व विभाग यांनी राबवून चौक मंडई येथील वाकडी बारी ते दूध बाजार तसेच भद्रकाली ते मेन रोड व धुमाळ पॉईंट ते एमजी रोड, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा पर्यंत मिरवणूक मार्ग मोकळा केले.

सोमवारी साजरी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभुमीवर आज मनपाच्या अतिक्रमण विभागाने सुट्टी असूनही शहरातील मेनरोडसह भद्रकाली आदी भागात विशेष अतिक्रमण मोहीम राबवून मिरवणूक मार्ग मोकळा केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. अतिक्रमण कारवाईत सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी योगेश रकटे व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व विभाग यांनी राबवून चौक मंडई येथील वाकडी बारी ते दूध बाजार तसेच भद्रकाली ते मेन रोड व धुमाळ पॉईंट ते एमजी रोड, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा पर्यंत मिरवणूक मार्ग मोकळा केले.

अतिक्रमण कारवाईत सुमारे दोन ट्रक भरून बॅगा, खुर्च्या, कपडे, स्टूल, स्टॅन्ड बोर्ड, कपड्यांसह पुतळे व इतर साहित्य जप्त करुन मनपाच्या आडगाव येथक्षल गोडाऊन येथे जमा करण्यात आले. विनायक जाधव, पश्चिम विभाग गाडी प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, सुनील कदम, बापू लांडगे, संतोष पवार, रतन गायकवाड, अनिल लोकरे, जगन्नाथ हंबरे, रमेश शिंदे, खैरनार सूर्यवंशी आदी मनपाच्या अधिकारी व सेवकांनी मोहीमेत भाग घेतला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी