22 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरक्राईमऔषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून नवविवाहितेची हत्या केली; लातूरमधील धक्कादायक प्रकार उघड

औषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून नवविवाहितेची हत्या केली; लातूरमधील धक्कादायक प्रकार उघड

आजकाल महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज याप्रकरणात नवनविन खुलासे होत असल्याचे दिसून येते अशांच प्रकराची एक घटना महाराष्ट्रातील लातूर मध्ये घडली आहे. 19 वर्षाच्या नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आजकाल महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज याप्रकरणात नवनविन खुलासे होत असल्याचे दिसून येते अशांच प्रकराची एक घटना महाराष्ट्रातील लातूर मध्ये घडली आहे. 19 वर्षाच्या नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी ही आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेली हत्या असल्याचा आरोप नवविवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. कोमल अजय बिराजदार असं या नवविवाहितेचे नाव आहे. तिने सोमवारी (28 नोव्हेंबर) सकाळी गळफास लाऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील हेर कुमठा गावात ही घटना घडली असून मृत नवविवाहिता ही मूळची नायगाव तालुक्यातील अल्लू वड गावची आहे.

औषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून हत्या केली : नातेवाईक
उदगीर तालुक्यातील हेर कुमठा इथे एका नवविवाहित मुलीने सोमवारी सकाळी गळफास घेतला. हा गळफास नसून सासरच्या लोकांनी हत्या केली, असा आरोप नवविवाहितेच्या नातेवाईकांनी केला. यावर्षी मे महिन्यातच तिचं लग्न झालं होतं. कोमलची आई पापड बनवण्याचं काम करते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कोमल सासरच्या जाचाला कंटाळली. सतत होणाऱ्या पैश्यांच्या मागणीमुळे ती त्रस्त होती. यातच काही दिवसांपूर्वी कोमल आजारी पडली. सोलापूर इथे तिच्यावर उपचार सुरू होते. त्यात दोन लाख रुपयांचा खर्च आला. त्यातील किमान एक लाख रुपये तरी माहेरवरुन घेऊन ये, असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. याच पार्श्वभूमीवर रविवारी (27 नोव्हेंबर) रात्री तिचा गळा दाबून जीव घेण्यात आहे. आता आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणाले… ग्रेट, राजभवनची खिंड पडली!

एक ओव्हर अन् 7 सिक्स; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने रचला विश्वविक्रम!

चंद्रकांत पाटलांनी बेळगावचे नाव बदलले!; मनीषा कायंदे यांचा संताप

उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. उदगीर इथल्या सरकारी दवाखान्यात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला आहे. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी मृत कोमलच्या नातेवाईकांनी केली आहे. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. इथून जाणार ही नाही, अशी भूमिका घेतली आहे.

विवाहितेच्या औषधोपचारांचा अर्धा खर्च द्यायला मी तयार होते. काही दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. माझ्या मुलीचा जीव घेतला, असा आक्रोश मयत कोमलची आई उषा काशिनाथ कोठाळे करत असल्यामुळे नातेवाईक भावनिक झाले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!