33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलव्ह जिहादच्या विरोधात नाशकात मोर्चा; ऋषी-मुनींसह हजारो लोक सहभागी

लव्ह जिहादच्या विरोधात नाशकात मोर्चा; ऋषी-मुनींसह हजारो लोक सहभागी

लव्ह जिहादच्या विरोधात सोमवारी (28 नोव्हेंबर) नाशिकमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा निषेध करण्यात आला. नाशिक शहरात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतात श्रद्धा वाल्कर हत्या प्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहुन या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकांकडून याप्रकरणातील आरोपी आफ्ताबला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली हे.मात्र, आफ्ताब प्रमाणे अनेक आरोपी लव्ह जिहादच्या नावावर असे कृत्य करत असतात. याच पार्श्वभूमीवर लव्ह जिहादच्या विरोधात सोमवारी (28 नोव्हेंबर) नाशिकमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा निषेध करण्यात आला. नाशिक शहरात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मूक मोर्चात ऋषी-मुनींसह हजारो लोक सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी लोकांनी श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोप असलेल्या आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

लव्ह जिहादविरोधी कायदा झाला पाहिजे, असे नाशिकच्या मूक मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले. धर्मांतर रोखण्याच्या कायद्याची महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यात काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे नुकतेच महाराष्ट्रातील मालेगावमध्ये कथित ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले होते. आदिवासी समाजातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 24 ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आईने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मालेगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने लग्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरत येथून इम्रान शेख याला अटक केली होती.

हे सुद्धा वाचा

औषधोपचारांचा खर्च दिला नाही म्हणून नवविवाहितेची हत्या केली; लातूरमधील धक्कादायक प्रकार उघड

संजय राऊत म्हणाले… ग्रेट, राजभवनची खिंड पडली!

चंद्रकांत पाटलांनी बेळगावचे नाव बदलले!; मनीषा कायंदे यांचा संताप

तब्बल 18 दिवसांनी पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. त्यावेळीही याला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप असल्याचे सांगून हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत संशयिताला मदत करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित मुलीला सावरण्यासोबतच पोलिसांनी संशयित इम्रान शेख याला सुरत येथून ताब्यात घेतले होते. असे असले तरी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच संशयास्पद असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. या प्रकरणातील संशयित इम्रानला मदत करणारे नातेवाईक, काझी आणि जादूगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या लोकांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी