30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सिटी लिंक ठेकेदाराला मनपा आयुक्तांची तंबी

नाशिक सिटी लिंक ठेकेदाराला मनपा आयुक्तांची तंबी

७ मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याच्या आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या बस वाहकांनी गत सहा दिवसांपासून संप पुकारले आहे. यामुळे सिटीलींकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी ठेकेदाराला त्वरीत बस रसत्यावर काढा, अन्यथा कडक कारवाई करुन ठेकाच रद्द करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे.शहरातील तपोवन डेपो येथील ५० तर नाशिक रोड येथील डेपोतून २० बसेस बंद करण्यात आल्याचे समजते. सिटी लिंकच्या नाशकात दोन डेपो अंतर्गत सुमारे अडीचशे हुन अडीचशे बसेस कार्यरत आहेत.

७ मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याच्या आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या < City Link > बस वाहकांनी गत सहा दिवसांपासून संप पुकारले आहे. यामुळे सिटीलींकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी ठेकेदाराला त्वरीत बस रसत्यावर काढा, अन्यथा कडक कारवाई करुन ठेकाच रद्द करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे.< NMC commissioner's nod City Link contractor > शहरातील तपोवन डेपो येथील ५० तर नाशिक रोड येथील डेपोतून २० बसेस बंद करण्यात आल्याचे समजते. सिटी लिंकच्या नाशकात दोन डेपो अंतर्गत सुमारे अडीचशे हुन अडीचशे बसेस कार्यरत आहेत.

त्यापैकी अनेक कामगारांचे वेतन हे डिसेंबर महिन्यापासून थकले असून काहींना अर्थ पेमेंट काही ना थोड्याशा मुदतीवर आश्वासन देत पुन्हा कार्यरत करण्यात आले होते. या संदर्भात मागील महिन्यातच सिटीलिंकच्या बस वाहकांना अचानक संप पुकारला होता. दहावी बारावीच्या परीक्षेच्या काळातच हा संप पुकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान महापालिकेने मध्यस्थी करीत या कंत्राटदारांशी बोलून महापालिकेने आगाऊ पेमेंट केले, मात्र प्रत्यक्षात कर्मचार्‍यांना काही वेतन दिले, तर काहींना न मिळाल्याने त्यांनी काम बंद आंदोलन केले होते. दरम्यान सात मार्चपर्यंत सर्वांना वेतन दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात अद्याप वेतन खात्यामध्ये जमा न झाल्याने १४ मार्च सकाळपासून सिटी लिंकच्या वाहकांनी आंदोलनाची भूमिका घेत बसेस बंद केल्या आहेत. तपोवन डेपोतील दीडशे पैकी १४६ तर नाशिक रोड येथील शंभर बसेस पैकी ५० अशा एकूण १९६ बसेस बंद करण्यात आल्या असून हा संपत त्वरित न मिटल्यास अन्य बसेसही बंद केल्या जाणार असल्याचा इशारा सिटी लिंकच्या वाहकांनी दिला आहे.

अचानक संपाचा हा निर्णय घेतल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेले नेहमीचे विद्यार्थी कंपनी कामगार महिला नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी लिंक या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बस ठेकेदार पद्धतीने दिले गेले असल्यामुळे त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. मागील संपामध्ये फक्त तपोवनातील बसेस बंद करण्यात आल्या होत्या नाशिक रोड येथील बस सेवा सुरळी सुरू होती, मात्र यंदा यावेळी नाशिकरोड आणि तपोवन या दोन्ही डेपोत संप पुकारला असून त्वरित वेतन मिळालाच हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सेटिंग वाहन युनियनचे संदीप गवळी यांनी सांगितले. तपोवन आणि नाशिकरोड डेपो अंतर्गत बसवाहकांना पगार न मिळणे, पगार वेळेवर न मिळणे, टप्प्याटप्प्याने पगार मिळणे अशा अनेक तक्रारीमुळे त्रस्त असलेल्या या सिटीलींक चालक वाहकांनी आंदोलन केले होते. दोन दिवसाच्या मध्यस्तीनंतर हा संप रात्री मिटण्यात आला होता. यावेळी आंदोलन करत त्यांना मार्च सात मार्चपर्यंत सर्वांचे वेतन खात्यात जमा होतील, असे आश्वासन दिले होते. सात तारखेनंतर जवळजवळ आठवडाभर पुन्हा वाट बघत थकीत वेतन व चालू वेतनही बँक खात्यात जमा न झाल्याने सिटी लिंकच्यावाहकांनी काम बंद पुकारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी