डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कांग्रेस हाऊस परिसर, सिम्पल टाईम्स, शितल शोरुम या ठिकाण जोरात या व्यावसाय सुरू आहे. देहविक्री पेक्षाही अधिक कमाई करून देणारा ड्रग्जचा व्यापार सुद्धा तेजीत सुरु आहे. ड्रग्ज व व्हायग्रासारख्या गोळ्यांच्या सेवनानामुळे गेल्या आठवड्यात एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू व्हाईट हाऊस या कुंठणखाण्याच्या आतमध्ये झाला आहे.
परंतु देहव्यापार व ड्रग्ज विक्री करणाऱ्या दलालांनी तो मृतदेह बाहेर काढला व नैसर्गिक मृत्यू आल्याचा आभास निर्माण केला. डॉ. डी. बी मार्ग पोलीस ठाण्यानेही या समाजकंटकांनाच साथ देवून वस्तुस्थिती समोर येणार नाही याची काळजी घेतली आहे.

बाहेरून टाळा असलेल्या या खोलीच्या आतमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने ड्रग्जचा व्यापार व वेश्याव्यवसाय सुरू आहे.
परंतु, नशामुक्त संघटनेचे सचिव अमोल महामे यांनी हे पितळ चव्हाट्यावर आणले. ‘लय भारी’ ने बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे पोलीस व दलालांचा डाव फसला आहे. पोलीस यह आयुक्त अभिनव देशमुख यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याकडून चौकशीचे आदेश काढून घेतले असून ते पायधूनी पोलीस ठाण्याकडे दिले आहेत.
दरम्यान एवढी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याने काँग्रेस हाऊस परिसरातील वेश्याग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. कुंटणखाण्यामध्ये ड्रग्ज, बांगलादेशी मुली, दारुच्या बाटल्या अवैधपणे आहेत, हे ‘लय भारी’ ने चव्हाट्यावर आणले. पण ते तपासण्याची काळजी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याने घेतली नाही.
हे सुद्धा वाचा
अबब ! वेश्यांनी ड्रग्ज दिल्याने तरूणाचा मृत्यू, पोलिसांकडून प्रकरण दडपण्यासाठी आटापीठा !
सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल
भारतीय शास्त्रज्ञाचा लढा दाखवणाऱ्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
दलाल म्हणतात आमचे कुणीच काही बिघडवू शकत नाही
ड्रग्ज व व्हायग्राच्या सेवनामुळे कुंठणखाण्यात एकजणाचा मृत्यू झाला. त्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अनेक दलालांनी ‘लय भारी’ला फोन करुन ‘समजावून’ सांगण्याचा प्रयत्न केला. लालजी नावाच्या दलालाने तर कळसच केला. या पूर्वी कितीतरी जणांनी बातम्या लिहील्या आंदोलने केली. ‘कितने आये कितने गए’ आमचे कुणीच बिघडवू शकत नाही. कस्टमर मागतात म्हणून आम्ही ड्रग्ज देतो. त्यामुळे आमच्यावर नाही तर कस्टमरवर कारवाई करायला हवी, असेही या लालजीने निर्लज्जपणे विधान केले.