28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्राईमनाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच

नाशिक शहारत खुनाचे सत्र सुरु झाले आहे. नाशिकरोड, उपनगर नंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर शिवारात मोकळ्या जागेत एकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या मृतांची ओळख पटली असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. या खून सत्रामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सोमवार दि. १९ रोजी संध्याकाळच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील एका मोकळ्या जागेत अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचा खुणा असलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला होता.

नाशिक शहारत खुनाचे सत्र सुरु झाले आहे. नाशिकरोड, उपनगर नंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर शिवारात मोकळ्या जागेत एकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या मृतांची ओळख पटली असून, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. या खून सत्रामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवार दि. १९ रोजी संध्याकाळच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील एका मोकळ्या जागेत अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचा खुणा असलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला होता.

दरम्यान मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला असता हा मृतदेह आसिफ परिख शेख, ३९, रा. वेताळ बाबा मंदिराजवळ, सातपूर याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आसिफ हा गेल्या काही महिन्यापासून घरी राहत नसून फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आसिफ याची हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली याचा गंगापूर पोलीस शोध घेत आहे. आसिफ हा भंगार गोळा करून आपला उदर्निर्वाह करीत असून त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे तपासात पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नाशिक शहरात काही दिवसांपासून पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरु झाले आहे. नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा आणि महिलेची हत्या करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात एका मुलीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे सध्या शहरात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरु झाल्याचे दिसत असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना रस्त्यावर उतरून पोलिसिंग सुरु करावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी