28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा क्षेत्रात केंद्रची नमस्ते योजना

नाशिक मनपा क्षेत्रात केंद्रची नमस्ते योजना

नाशिक महापालिका क्षेत्रातील मलनिःसारण विभागात काम करणारे कर्मचारी व घनकचरा व्यवस्थापन विभागात सेप्टीक टँक साफसफाई करणारे कर्मचारी यांचा एकत्रित डाटा बेस तयार करण्यासाठी केंद्रशासनामार्फत नमस्ते योजना राबविण्यात येत आहे.ही योजना सहकार्य केंद्रीय सामाजिक न्याय व सहकार्य केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या विद्यमाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त संस्था यांच्या मार्फत राबविण्यात येत असून त्याचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल व घनकचरा व्यवस्थापक विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

नाशिक महापालिका क्षेत्रातील मलनिःसारण विभागात काम करणारे कर्मचारी व घनकचरा व्यवस्थापन विभागात सेप्टीक टँक साफसफाई करणारे कर्मचारी यांचा एकत्रित डाटा बेस तयार करण्यासाठी केंद्रशासनामार्फत नमस्ते योजना राबविण्यात येत आहे.ही योजना सहकार्य केंद्रीय सामाजिक न्याय व सहकार्य केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या विद्यमाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त संस्था यांच्या मार्फत राबविण्यात येत असून त्याचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल व घनकचरा व्यवस्थापक विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.यावेळी राज्य शासनाचे समन्वय प्रियंका गांगुर्डे यांच्यासह मनपा कार्यकारी अभियंता गणेश मैंड, उपअभियंता गाजुल, अजय खोजे तसेच कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी