29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईमनरेश कारडा , अशोक कटारिया यांना लुक आउट नोटीस

नरेश कारडा , अशोक कटारिया यांना लुक आउट नोटीस

फसवणूक व एमपीआयडीअंतर्गत गुन्हे दाखल असलेले बांधकाम व्यावसायिक पोलिस चौकशीला नोटीस बजावूनही आलेले नाहीत. घरझडतीवेळीही ते घरात आढळलेले नाहीत. तर काही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून पसार झाले आहेत. त्यामुळे त्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात नाशिक पोलिस आयुक्तांनी ‘लूक आउट नोटीस जारी केली आहे. तसा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयास दिला असून, केंद्रीय तपास यंत्रणांकडे ‘लुक आउट नोटीस जाणार आहे. यामुळे संशयित नरेश कारडा, अशोक कटारिया, अनुप कटारिया व सतीश पारख यांच्या अडचणी वाढल्या आहेत

फसवणूक व एमपीआयडीअंतर्गत गुन्हे दाखल असलेले बांधकाम व्यावसायिक पोलिस चौकशीला नोटीस बजावूनही आलेले नाहीत. घरझडतीवेळीही ते घरात आढळलेले नाहीत. तर काही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून पसार झाले आहेत. त्यामुळे त्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात नाशिक पोलिस आयुक्तांनी ‘लूक आउट नोटीस ( lookout notice ) जारी केली आहे. तसा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयास दिला असून, केंद्रीय तपास यंत्रणांकडे ‘लुक आउट नोटीस जाणार आहे. यामुळे संशयित नरेश कारडा, अशोक कटारिया, अनुप कटारिया व सतीश पारख (Naresh Karda, Ashok Kataria ) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.(Naresh Karda, Ashok Kataria get lookout notice )

ऑक्टोबर २०२३ पासून कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्यासह संशयितांविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झालेले आहेत. तर, नरेश कारडा यांच्यासह ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया, सतीश पारख यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीसह एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून गेल्या आठवड्यात संशयितांच्या कार्यालय व घरी उपनगर पोलिसांनी झडतीसत्र राबविले. दरम्यान, गेल्या आठवड्यात नरेश कारडा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तर, अशोक कटारिया यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या २९ तारखेला जिल्हा न्यायालयात सुनावणी आहे.उपनगर पोलिसांनी संशयितांना पोलिस चौकशीसाठी नोटिसाही बजावल्या. परंतु अद्याप ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. तसेच, संशयित शहरातून पसार झालेले आहेत. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तालयातर्फे संशयितांविरोधात फास आवळायला प्रारंभ केला आहे.संशयितांविरोधातील सर्व गुन्ह्यांत सोळा कोटी रुपयांपर्यंत अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. कटारिया यांच्याविरुद्ध एक गुन्हा नोंद असून त्यात ९९ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. सर्व गुन्ह्यांच्या तपासात उपायुक्त परिमंडळ दोनच्या पथकासह उपनगर पोलिसांनी कारडा, कटारिया व पारख यांच्या घरासह कार्यालयात झडती घेतली आहे. बांधकाम प्रकल्प आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत.

त्या अर्जाने अडचणी वाढणार
मनोहर कारडा यांच्या आत्महत्येसंदर्भात त्यांच्या पत्नी भारती कारडा यांनी पोलिसांकडे अर्ज करीत १९ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याप्रकरणी डायरीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यातील १९ जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी