31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमलासलगाव ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या

लासलगाव ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या

येथील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कविता भागवत गरड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव ग्रामपंचायत मध्ये लायब्ररियन असलेल्या कविता भागवत गरड (वय ३३) या महिलेने तिच्या राहत्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती मयत कविताची बहीण निशा किरण गरड हिने लासलगाव पोलिस ठाण्यात दिली.

येथील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली. कविता भागवत गरड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव ग्रामपंचायत मध्ये लायब्ररियन असलेल्या कविता भागवत गरड (वय ३३) या महिलेने तिच्या राहत्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती मयत कविताची बहीण निशा किरण गरड हिने लासलगाव पोलिस ठाण्यात दिली. ( Woman employee of Lasalgaon gram panchayat commits suicide)

या माहितीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोलप करत आहे. मयत कविता हीचे पती देखील लासलगाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते. त्यांचा देखील दोन वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मयत कविताच्या पश्चात दोन लहान मुले व एक लहान मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी