31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमनाशिक हादरले : १४ वर्षीय मुलाची दहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक हादरले : १४ वर्षीय मुलाची दहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक शहरात गंगापूर रोड परिसरातील सीरिन मीडोज परिसरातील असलेल्या आर्चित झोडीयाक या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून १४ वर्षीय शाळकरी मुलाने उडी घेत आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरची घटना बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, मयत मुलाने मानसिक नैराश्यातून सदरचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेमुळे कुटूंबियांना मोठा धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. आदित्य श्रीकांत भांडारकर (१४, रा. आर्चित झोडियाक, सीरिन मेडोज्‌, गंगापूर रोड) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा गंगापूर रोड परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. बुधवारी (ता.२०) सकाळी शाळेला जाण्यासाठी आदित्य याने तयारी केली होती. (nashik-14-year-old-boy-commits-suicide-by-jumping-off-10th-floor)

त्यानंतर तो इमारतीच्या टेरेसवर गेला आणि सात ते सव्वा सात वाजेच्या दरम्यान त्याने दहाव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून दिले.इमारतीचे सुरक्षारक्षक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यास तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहेआदित्य यांचे वडील श्रीकांत भांडारकर हे व्यावसायिक आहेत. घटनेची माहिती मिळताच आदित्याच्या आई-वडलांना मोठा मानसिक धक्का बसला. वडील यांना तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर आईचीही प्रकृती बिघडली होती. आदित्य याचे मागे आई-वडील व पाच वर्षांची लहान बहीण आहे.

मानसिक नैराश्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा अभ्यासात हुशार होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो घरामध्ये एक-एकटा वागत होता. शांत स्वभावाचा असला तरी घरात त्याचे बोलणे कमी झाले होते. त्यामुळे तो काहीतरी मानसिक नैराश्यात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी व्यक्त केला आहे
मयत मुलाने मानसिक नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. परिसरात देखील या घटनेला हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत आदित्यचे वडील हे व्यावसायिक असल्याची देखील माहिती समोर येत आहे. अवघ्या १४ वर्षीय आदित्यने हे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या वडिलांना आणि आईला जबर मानसिक धक्का बसला आहे. आई आणि वडील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना देखील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी