30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली...

IPL 2024: MS धोनीने कर्णधारपद सोडल्याबद्दल रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केली पोस्ट 

IPL 2024च्या पहिल्या सामनाच्या पूर्वसंध्येला महेंद्र सिंह धोनी ने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने रुतुराज गायकवाडला कर्णधारपदाची जबाबदारी दिली. या बातमीने धोनीच्या चाहत्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झाला आहे. (IPL 2024 Rohit Sharma gets emotional over MS Dhoni stepping down as captain) आता याविषयी तर्क लावले जात आहे की, धोनी यंदाच्या हंगामात खेळतांना पण दिसणार की नाही. धोनीच्या या निर्णयानंतर एकीकडे सोशल मीडिया त्यांच्या चाहत्यांकडून वेगवेगळे पोस्ट शेअर केले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. (IPL 2024 Rohit Sharma gets emotional over MS Dhoni stepping down as captain)

IPL 2024च्या पहिल्या सामनाच्या पूर्वसंध्येला महेंद्र सिंह धोनी ने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने रुतुराज गायकवाडला कर्णधारपदाची जबाबदारी दिली. या बातमीने धोनीच्या चाहत्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झाला आहे. (IPL 2024 Rohit Sharma gets emotional over MS Dhoni stepping down as captain) आता याविषयी तर्क लावले जात आहे की, धोनी यंदाच्या हंगामात खेळतांना पण दिसणार की नाही. धोनीच्या या निर्णयानंतर एकीकडे सोशल मीडिया त्यांच्या चाहत्यांकडून वेगवेगळे पोस्ट शेअर केले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. (IPL 2024 Rohit Sharma gets emotional over MS Dhoni stepping down as captain)

IPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एमएस धोनीसोबत हस्तांदोलन करत आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये हँडशेक इमोजीही शेअर केला आहे. या दोन्ही खेळाडूंचा कर्णधारपदाचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाचवेळा विजेतेपद जिंकले. तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या टीमने देखील पाच विजेतेपद आपल्या नावे केली आहे.

rohit sharma

सीएसकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.”एमएस धोनीने टाटा आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले,” रुतुराज 2019 पासून चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याने आयपीएलमध्ये 52 सामने खेळले आहेत.

IPL 2024: MS धोनीचा राजीनामा, रुतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जचा नवा कर्णधार

27 वर्षीय स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद भूषवले आहे. धोनीने 212 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले आहे. जडेजाने 8 तर रैनाने 5 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.

रुतुराज गायकवाडबद्दल जाणून घ्याच म्हटलं तर या खेळाडूने 2020 च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये 52 सामने खेळला आहे. चेन्नई फ्रँचायझी गायकवाडला एका हंगामासाठी 6 कोटी रुपये देत आहे. तर धोनीला 12 कोटी रुपये मिळत आहेत.

रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सरफराज खानबद्दल म्हटलं ‘असं’ काही

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक 

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 वाजता
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 वाजता
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 वाजता
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
13. दिल्ली सुपर कॅपिटल्स वि चेन्नई किंग्स, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रिडर्स 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
17. गुजरात टायटन्स विरुद्ध  पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, 7.30 वाजता
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, 7.30 वाजता
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी