35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमनाशिक शहरात काही दिवसांपासून बंद असलेल्या अमली पदार्थ विक्रीचे व्यवसाय पुन्हा सुरू

नाशिक शहरात काही दिवसांपासून बंद असलेल्या अमली पदार्थ विक्रीचे व्यवसाय पुन्हा सुरू

शहरात काही दिवसांपासून बंद असलेल्या अमली पदार्थ विक्रीचे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले असल्याचे पोलीस कारवाईतून दिसते आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी आता आपले बस्तान नव्या भागात सुरू केले असल्याचे दिसते आहे. विशेष करून आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक महाविद्यालय आणि वसतिगृह असल्याने अवैध अधंदे चालकांनी हे हेरून या परिसरात एमडी ड्रग्स आणि गांजा विक्री सुरु केली आहे. या अंमली पदार्थ विक्रीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी याच्या आहारी जाऊ लागल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. एकाच आठवड्यात दोन कारवाया झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहे.

आडगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार दादासाहेब वाघ यांना संशयित गांजा विक्रीसाठी धात्रक फाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली असता, त्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना दिली. त्याअनुषंगाने आडगाव शिवारातील धात्रक फाटा या ठिकाणी सापळा रचून रविवारी (दि.१८) रात्री पावणे बाराच्या सुमारास संशयित गिद दुचाकीवरून (एमएच १५ इआर ४७९०) आला असता दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, गुन्हे शाखा एकच्या पथकाने संशयित अशोक भावराव गिद (५९, रा. नंदन गार्डन बिल्डिंग, उपनगर) याच्या फ्लॅटची झडती घेत फ्लॅटमध्ये दडवून ठेवलेला सुमारे ४ लाख ७१ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे.

ही संयुक्त कामगिरी युनिट एकचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, अशोक पाथरे, पोलिस हवालदार देवराम सुरंजे, सुरेश नरवडे, शिवाजी आव्हाड,निलेश काटकर, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, देविदास ठाकरे, विलास चारोस्कर, राजेश राठोड, नितीन जगताप, मुक्तार शेख, आप्पा पानगळ, राहुल पालखेडे यांच्या पथकाने केली.

बहुचर्चित ड्रग्स माफिया ललित पाटीलशी संबंधित नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला असतानाही नाशिक शहर व परिसरात अद्यापही चोरी छुप्या पद्धतीने एम. डी. ड्रज (मॅफेड्रॉन) पावडरची पुड्यांमध्ये विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आडगाव शिवारात हनुमान नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर एका पेडलरला अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून ५.५ ग्रॅम इतकी एमडी पावडर जप्त केली आहे. धम्मराज ऊर्फ सागर बाळासाहेब शार्दुल (१८, रा. राजवाडा, म्हसरूळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

एकाच आठवड्यात आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विकणाऱ्यांना अटक केल्याने आडगाव शिवार अंमली पदार्थ विक्री करण्याचे केंद्र बनत चालले असल्याचे दिसत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे राज्यभरातून आणि परराज्यातून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याठिकाणी वसतिगृहात किंवा फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. त्यामुळे त्यांच्यावर पालकांचा दबाव नसल्याने त्यांना अनेक प्रकारचे व्यसन लागणे साहजिकच असते. हेच हेरून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी आडगाव शिवार आपले डेस्टिनेशन ठेवले असावे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी