33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : शरद पवार गटाच नवं चिन्हं ‘तुतारी’ उद्या रायगडावर घुमणार!

Maharashtra Politics : शरद पवार गटाच नवं चिन्हं ‘तुतारी’ उद्या रायगडावर घुमणार!

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ गटाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचं लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने  राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू होत्या. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी आणि शिट्टी यांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह दिलं आहे.

‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत, हे स्पष्ट आहे.

हेही वाचा : Lok Sabha Elecation : आम्ही लोकसभा निवडणुकीत किमान ‘इतक्या’ जागा जिंकू, फडणवीसांनी सांगितला आकडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी