29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात जॉगिंग ट्रक भेट हा अभिनव उपक्रम सुरु

नाशिक शहरात जॉगिंग ट्रक भेट हा अभिनव उपक्रम सुरु

नाशिक शहरात वाढणारी गुन्हेगारी आणि नागरिकांशी पोलिसांचे अतूट होण्यासाठी पोलीस आयुक्तांनी जॉगिंग ट्रक भेट हा अभिनव उपक्रम सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, इतर पोलीस अधिकारी, अंमलदार हे स्वतः जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचना नुसार पोलीस गस्त आणि इतर उपाय योजना करण्यात येणार आहे.नाशिक शहरात लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना आरोग्य अबाधित राखण्यासाठी विविध ठिकाणी जॉगींग ट्रॅक उपलब्ध आहेत.

नाशिक शहरात वाढणारी गुन्हेगारी आणि नागरिकांशी पोलिसांचे अतूट होण्यासाठी पोलीस आयुक्तांनी जॉगिंग ट्रक भेट हा अभिनव उपक्रम सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, इतर पोलीस अधिकारी, अंमलदार हे स्वतः जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. नागरिकांकडून आलेल्या सूचना नुसार पोलीस गस्त आणि इतर उपाय योजना करण्यात येणार आहे.नाशिक शहरात लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी त्यांना आरोग्य अबाधित राखण्यासाठी विविध ठिकाणी जॉगींग ट्रॅक उपलब्ध आहेत. या जॉगींग ट्रकवर नागरीक मोठ्या संख्येने सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळी वॉकीग, जॉगींग साठी येत असतात. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून थेट जॉगिंग ट्रॅकवर पोलीस अधिकारी स्वतः जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधणार आहे. तसेच, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत पोलिसिंग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या उपक्रमाची सुरुवात शनिवार दि. २४ रोजी सकाळी सात वाजेपासून करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक शहरातील एकुण ३५ जॉगींग ट्रॅकवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जॉगींग ट्रॅकला भेट देण्यासाठी ७८ पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक जॉगिंग ट्रॅकसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. हे नोडल अधिकारी संबंधित परिसराचे सुरक्षा ऑडिट करून सुरक्षा संबंधी उपाययोजना सुचवून त्याप्रमाणे मनुष्यबळ पेट्रोलिंग साठी नेमणे व इतर उपाययोजना करणार आहे. हे नोडल अधिकारी जॉगींग ट्रॅकला आठवडयातुन एकदा भेट देऊन नागरिकांशी वॉक मध्ये सहभागी होवुन त्यांच्याशी संवाद साधतील. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातून एकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी हे जॉगींग ट्रॅकला भेट देवुन नागरीकांशी संवाद साधुन व त्यांचे म्हणणे जाणुन घेणार आहेत.

पोलीस ठाणे निहाय निवडण्यात आलेले जॉगिंग ट्रॅक – पंचवटी – सहकार महर्षी कै. उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक, ड्रीम कॅसल सिग्नल, मखमलाबाद रोड, आडगाव- तपोवन जॉगिंग ट्रॅक, धात्रक फाटा जॉगिंग ट्रॅक, म्हसरूळ – चामरलेणी, सुयोजित गार्डन कडे जाणारा रस्ता,सावरकर गार्डन, सरकारवाडा – वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक, पी. अँड टी. कॉलनी , रामदास गार्डन जॉगिंग ट्रॅक, मुंबई नाका – गोल्फक्लब मैदान, भद्रकाली – त्रिकोणी गार्डन, गंगापूर – समर्थ जॉगिंग ट्रॅक, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, नाशिकरोड – अमृत वन उद्यान, कमलाकर जॉगिंग ट्रॅक, नरवीर तानाजी मालुसरे जॉगिंग ट्रॅक विष्णू नगर उद्यान जॉगिंग ट्रॅक, सिन्नर फाटा, देवळाली कॅम्प – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्राउंड, खळवाडी जॉगिंग ट्रॅक भगूर, उपनगर – शिखरे वाडी जॉगिंग ट्रॅक, मुक्तीधाम मागील शाळा जॉगिंग ट्रॅक,डीजीपी नगर न. १ जॉगिंग ट्रॅक, इच्छामणी मंदिरासमोरील जॉगिंग ट्रॅक, गाडेकर मैदान जॉगिंग ट्रॅक, अंबड – राजे संभाजी स्टेडियम, बाळासाहेब ठाकरे, राजमाता जिजाऊ मार्ग, वावरेनगर,पाटीलनगर, पवननगर स्टेडियम, चुंचाळे पोलीस चौकी – संत शिरोमणी सावतामाळी उद्यान, इंदिरानगर – इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, गामणे मळा जॉगिंग ट्रॅक, पांडवलेणी जॉगिंग ट्रॅक, सातपूर – ई. एस. आय. सी. ग्राउंड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी