29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यहोळीच्या दिवशी झटपट बनवा 'हे' टेस्टी स्नॅक्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल

होळीच्या दिवशी झटपट बनवा ‘हे’ टेस्टी स्नॅक्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल

होळीचा सण (Holi 2024) 24 आणि 25 मार्चला साजरा केला जात आहे. हा सण प्रेम, उत्साह आणि आनंदाचा आहे. या दिवशी लोकं आपले सर्व जुने वाद विसरून नवीन सुरुवात करायचा प्रयन्त करतात. होळी हा वसंत ऋतूमध्ये फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. (Holi 2024 Special Snacks How To Make Sev Puri At Home) होळीचा सण परंपरेने दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलालाची उधळण करून होळीचा सण साजरा केला जातो.

तुमच्या दातांवर देखील आला पिवळेपणा? मग आता घरबसल्या करा ‘हे’ सोपे उपाय

यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल. त्यामुळे होलिका दहन रविवार, 24 मार्च रोजी होणार असून, 25 मार्च रोजी धूलिवंदन खेळली जाणार आहे.(Holi 2024 Special Snacks How To Make Sev Puri At Home)

व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ

होळीच्या (Holi 2024) दिवशी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. होळीच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन गुलाल उधळतात. घरी पाहुणे येतात. तुम्हालाही या होळीमध्ये तुमच्या पाहुण्यांना स्नॅक्स म्हणून काही स्वादिष्ट पदार्थ द्यायचे असतील, तर तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात; हे करा घरगुती उपाय अन् मिळवा तजेलदार त्वचा

 • घरी कशी बनवायची शेव पुरी (Sev Puri)
  साहित्य-
 1. मैदा
 2. रवा
 3. उकडलेले मॅश केलेले बटाटे
 4. चिरलेला कांदा
 5. टोमॅटो
 6. चवीनुसार मीठ
 7. लाल सॉस
 8. चिंचेची चटणी
 9. हिरवी चटणी
 10. गरजेनुसार तेल
 11. ओवा
 12. चाट मसाला
 13. एक चिमूटभर जिरे पावडर
 14. लिंबाचा रस

पद्धत-
एका भांड्यात मैदा, रवा, मीठ, ओवा आणि तेल एकत्र करून त्यात पाणी घालून पीठ तयार करा. नंतर हे पीठ पोळीसारखे लाटून लहान गोल कटरच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या कापून घ्या. कढईत तेल गरम करून पुरी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा. आता एका प्लेटमध्ये पुऱ्या व्यवस्थित करा, त्यावर उकडलेले मॅश बटाटे, कांदे आणि टोमॅटो घाला. तिन्ही चटण्या घालून शेव, चाट मसाला, मीठ आणि जिरेपूड घाला. शेवटी लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी