29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमनाशिक मेडिकव्हर हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाची चार तोळ्याची पोत लंपास

नाशिक मेडिकव्हर हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाची चार तोळ्याची पोत लंपास

संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकर आव्हाड (वय ६८ रा. सातपूर नाशिक) हे रविवारी (दि.२५) आपल्या कुटुंबियांसमवेत संगमनेर- देवगड येथे यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, सुधाकर आव्हाड यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारार्थ संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस आयसीयु मध्ये दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यांना जनरल वार्डमध्ये ठेवण्यात आले.

संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुधाकर आव्हाड (वय ६८ रा. सातपूर नाशिक) हे रविवारी (दि.२५) आपल्या कुटुंबियांसमवेत संगमनेर- देवगड येथे यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, सुधाकर आव्हाड यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारार्थ संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस आयसीयु मध्ये दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यांना जनरल वार्डमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सीताबाई आव्हाड होत्या.

दरम्यान, बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जनरल वॉर्डमध्ये आव्हाड दांपत्य झोपी गेले. झोपण्यापूर्वी सीताबाई आव्हाड यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याची पोत काढून ठेवली होती. सकाळी उठल्यानंतर पोत जागेवर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. कर्पे, शिरसाठ, थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हॉस्पिटल मधील संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी