33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पिण्याचे पाणी द्या..अन्यथा पाईपलाईन उखडून टाकण्यासाठी जेसीबी पाठवा...नगरिंकाची आर्त हाक

नाशिक पिण्याचे पाणी द्या..अन्यथा पाईपलाईन उखडून टाकण्यासाठी जेसीबी पाठवा…नगरिंकाची आर्त हाक

परिसरातील मंदाताई दातीर मळा, सिरसाट मळा, आमटे मळा, श्रीपत दातीर मळा, हरी रावजी दातीर मळा, सरपंच मळा, भिकाजी दातीर मळा, दोंदे मळा, रघुनाथ दातीर मळा परिसरामध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासुन पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नाही, परिसरातील नागरिक कारखान्यांतून पाणी आणून कुटुंबाची तहान भागवत आहे. त्यासाठी विविध आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सर्व अधिकऱ्यांना निवेदने देण्यात आली. परंतु नाशिक महानगर पालिका अंबड परिसराला अद्याप पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. नाशिक शहरात १० - १० मजली इमारतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. परंतु अंबड भागात जमिनीवर असलेल्या घरांना मनपा पाणी पुरवठा करू शकत नाही.

परिसरातील मंदाताई दातीर मळा, सिरसाट मळा, आमटे मळा, श्रीपत दातीर मळा, हरी रावजी दातीर मळा, सरपंच मळा, भिकाजी दातीर मळा, दोंदे मळा, रघुनाथ दातीर मळा परिसरामध्ये गेल्या १० ते १२ वर्षापासुन पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नाही, परिसरातील नागरिक कारखान्यांतून पाणी आणून कुटुंबाची तहान भागवत आहे. त्यासाठी विविध आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या सर्व अधिकऱ्यांना निवेदने देण्यात आली. परंतु नाशिक महानगर पालिका अंबड परिसराला अद्याप पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे. नाशिक शहरात १० – १० मजली इमारतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. परंतु अंबड भागात जमिनीवर असलेल्या घरांना मनपा पाणी पुरवठा करू शकत नाही. विविध आंदोलने, मोर्चे काढल्यानंतर वर्षभरापूर्वी नवीन पाईपलाईन सदर परिसरात टाकण्यात आली. परंतु त्या पाईप लाईनला मनपा पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे जेसीबी पाठवून केलेली पाईपलाईन उखडून टाकावी. अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. त्यासंदर्भात नाशिक महानगर पालिकेचे अभियंता रविंद्र धारणकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या मंदाताई दातीर, सविता दातीर, आशा दातीर, शरद दातीर, स्वप्नील , अभिषेक दातीर व परिसरातील नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी