28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्राईमनाशिकच्या सातपूर मध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड

नाशिकच्या सातपूर मध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड

श्रमिकनगर सात माऊली चौक परिसरात रविवारी सकाळी वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविणाऱ्या संशयितांची सोमवारी सायंकाळी सातपूर पोलिसांनी धिंड काढली.सात माऊली चौक परिसरात रविवारी काही टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे यांनी अवघ्या चार तासात या संशययितांच्या मुस्क्या आवळल्या.यात सागर हुलनोर, सुधीर भालेराव, ऋषिकेश उर्फ संकेत पवार, दीपक अहिरे, मिलिंद मुंढे (सर्व राहणार श्रमिक नगर) यांना ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, ज्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या त्या परिसरात सोमवारी (दि.१९) या संशयितांची धिंड काढण्यात आली.

श्रमिकनगर सात माऊली चौक परिसरात रविवारी सकाळी वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविणाऱ्या संशयितांची सोमवारी सायंकाळी सातपूर पोलिसांनी धिंड काढली.सात माऊली चौक परिसरात रविवारी काही टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे यांनी अवघ्या चार तासात या संशययितांच्या मुस्क्या आवळल्या.

यात सागर हुलनोर, सुधीर भालेराव, ऋषिकेश उर्फ संकेत पवार, दीपक अहिरे, मिलिंद मुंढे (सर्व राहणार श्रमिक नगर) यांना ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, ज्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या त्या परिसरात सोमवारी (दि.१९) या संशयितांची धिंड काढण्यात आली.यावेळी सात माऊली चौक, झेडपी कॉलनी, शनी चौक मार्गे पायी धिंडया काढण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक शाम जाधव, पोलीस कर्मचारी विलास गीते सागर गुंजाळ यांच्यासह डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते. नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून टवाळ खोरांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी