28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाIPL 2024 सुरु होण्याआधी उज्जैनला पोहोचला KL राहुल, महाकालचा घेतला आशीर्वाद आणि... 

IPL 2024 सुरु होण्याआधी उज्जैनला पोहोचला KL राहुल, महाकालचा घेतला आशीर्वाद आणि… 

22 मार्च पासून आयपीएलच्या 17व्या (IPL 17) हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधी भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul Reached Ujjain to Seek Blessings of Mahakal Before IPL 2024) महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला पोहोचला. के एल सोबत त्याचे  वडील डॉ.केएन लोकेश आणि आई राजेश्वरी लोकेशही उपस्थित होते. तिथे त्याने बाबा महाकालची आरती केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

IPL 2024च्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत पोहोचली विराट कोहलीची टीम, पहा व्हिडिओ

राहुल सकाळी 6 वाजता भस्म आरती संपल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहाच्या उंबरठ्यावर पोहोचले, त्यांनी बाबा महाकालची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. बाबा  महाकालची पूजा करण्यासाठी राहुल मंदिराच्या आतील गाभाऱ्यात गेला आणि स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आशीर्वाद मागितले. मंदिराचे पुजारी आशिष पुजारी यांनी विधी पार पाडले. ‘भस्म आरती’  हा येथील प्रसिद्ध विधी आहे. पहाटे साडेतीन ते साडेपाच वाजेच्या सुमारास ‘ब्रह्म मुहूर्ता’मध्ये हे केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार भस्म आरतीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्ताच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात. (KL Rahul Reached Ujjain to Seek Blessings of Mahakal Before IPL 2024)

याआधी केएल राहुल गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये पत्नी अथिया शेट्टीसह महाकालच्या दरबारात गेला होता. मात्र, यावेळी तो आयपीएल सुरू होण्यापूर्वी येथे पोहोचला. तुम्हाला सांगते की, केएल राहुल फेब्रुवारी 2023 मध्ये महाकाल मंदिरात गेला होता, तेव्हा तो फॉर्म मध्ये नव्हता. त्यानंतर आयपीएल 2023 मध्येही तो जखमी झाला होता. यामुळे त्याला बराच काळ क्रिकेट पासून दूर राहावे लागले. 10 सप्टेंबर 2023 रोजी, राहुलने आशिया चषक स्पर्धेतील पुनरागमन सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 111 धावांची शानदार खेळी खेळली.

आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करणार नवज्योत सिंग सिद्धू, लोकसभा निवडणूक लढवण्यास दिला नकार

तुम्हाला सांगते की, गेल्यावर्षी मार्च 2023 मध्ये, भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली देखील पवित्र भस्म आरती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मासह उज्जैन मधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात गेला होता.

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारा लखनौचा संघ 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी