33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमपोलिसाने केला गर्भवती महिलेचा विनयभंग ; गुन्हे शाखेच्या पोलिसाचे निलंबन

पोलिसाने केला गर्भवती महिलेचा विनयभंग ; गुन्हे शाखेच्या पोलिसाचे निलंबन

गाडीची मोटारसायकलला धडक लागल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दारूच्या अमलाखाली असलेल्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसाने भर रस्त्यात एका गर्भवती महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईतील खारघरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. दिनेश महाजन असे या पोलिसाचे नाव आहे. (Pregnant woman molested by Police suspended) हा मुजोर पोलीस अधिकारी दारू पिऊन गाडी चालवत होता. तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत मोटारसायकलवरून जात असताना मेट्रो पुलानजीक मंगळवारी ७.०० वाजण्याच्या सुमरास ही घटना घडली.

खारघरमध्ये ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत मोटारसायकलवरून जात असताना या दिनेश महाजनची गाडी त्यांच्या मोटारसायकलला घासून पुढे निघून गेली. त्यामुळे तिच्या पतीचा तोल गेला पण त्यांनी त्यावर लगेचच नियंत्रण मिळवले. त्यामुळे घाबरून त्या महिलेने गाडीकडे पाहात ती चालकावर ओरडली. दारुड्या पोलिसाच्या गाडीचा तिच्या पतीने पाठलाग करत त्याची गाडी अडवली.त्यावेळी दिनेश महाजन आणि तक्रारदार महिलेच्या पतीमध्ये बाचाबाची झाली. आपण गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याची धमकी दिनेशने तिच्या पतीला दिल्याचे तसेच त्याच्या गाडीत ‘पोलीस’ असे लिहिलेली पाटी असल्याचे त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. पण हे खोटे असून मी पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे त्याने नंतर सांगितले.

हे सुद्धा वाचा

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

जितेंद्र आव्हाडांना कधीही अटक होणार ; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

तरुणीला विवस्त्र करून विडिओ केला व्हायरल ; पुण्यातील घटना

या मुजोर पोलिसाने गर्भवती महिलेचा हात पकडून तिला बाजूला ढकलून दिले. त्यांचे भांडण ऐकून लोकांची गर्दी जमा झाली आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना खारघर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर पोलीस दारूच्या नशेखाली असल्याचे समजले, असे माहिती खारघर पोलिसांनी दिली. दिनेश महाजनने तिच्यावर हल्ला केल्याचे तिने सांगितल्यामुळे तिचीदेखील वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दिनेश महाजनला निलंबित करण्यात आले असून पोलीस उपपयुक्त संजय पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, दिनेश महाजनला अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस उपयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी