33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्राईमनाशकात पतीला सर्पदंश करणारी निर्दयी पत्नी साथीदारासंह अटकेत

नाशकात पतीला सर्पदंश करणारी निर्दयी पत्नी साथीदारासंह अटकेत

खर्चासाठी पैसे देत नाही आणि फिरायचे स्वातंत्र्य देत नसल्याने पत्नीने आपल्या दोन साथीदारांसह मिळून थेट पतीचा काटा काढण्यासाठी विषारी सर्प दंश करून गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती.  या गुन्ह्यामध्ये संशयित  असलेली  निर्दयी पत्नी सोनी उर्फ एकता विशाल पाटील, ३४, तिचा साथीदार संशयित चेतन प्रवीण घोरपडे, २१, रा. लातूर, आणि माधुरी संतोष पाटील, ३४, रा. लातूर यांना लातूर जिल्ह्यातून अटक केली असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे. घटनेने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली होती.

फिर्यादी विशाल पोपटराव पाटील, ४१ रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांची पत्नी संशयित सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिने शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी पत्नी एकता हिने विशालला बियर पाजून त्यानंतर घरात एका अज्ञात संशयिताला बोलावून घेत विशालला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अज्ञात संशयिताने गळा आवळला तर पत्नी एकता हिने हेल्मेटने मारहाण करत उशीने तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विशाल जीव वाचविण्यासाठी झटापट करत असल्याने संशयिताने आपल्या सोबत आणलेल्या विषारी सापाचा चावा विशालला दिला होता. मात्र, याच वेळी विशालने आपली सुटका करून घेत पळ काढत आपला जीव वाचविला होता. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी विशाल पोपटराव पाटील, ४१ रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांची पत्नी संशयित सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिला पहिल्यापासून अतिखर्चिक आणि चांगले राहण्याची सवय होती. मात्र, आपली आर्थिक परस्थिती साधारण असल्याने तिला खर्च कमी ठेवण्याचा आग्रह करीत असल्याने पत्नी पत्नीमध्ये कायम वाद होत होते. त्यानंतर वाद झाल्यानंतर एकदा एकता आपल्या लातूर येथील मैत्रिणीकडे निघून गेली होती.

मात्र, तिची समजूत काढून तिला पुन्हा नाशिकला विशालने आणल्यानंतर पाच सहा महिने दोघे चांगला संसार करत असल्याचे विशाल याने फिर्यादीत सांगितले आहे. मात्र, अचानक शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी पत्नी एकता हिने विशालला बियर घेऊन येण्यास सांगितले. यावर विशालने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच एकताने त्याला बियर साठी पैसे दिले. त्यानंतर बियर पिण्यास देऊन एकता आपल्या मुलीला घेऊन बेडरूम मध्ये झोपायला गेली. मुलीला झोपवून एकता पुन्हा विशालसोबत येऊन बसली त्यानंतर रात्री सुमारे पावणे अकरा वाजेच्या सुमारास विशालने तिला जेवण देण्यास सांगितले त्यावेळी एकता हिने घराचा मागील दरवाजा उघडा ठेवून स्वयंपाक घरात गेली. दरम्यान याचवेळी उघड्या दरवाज्यातून एक अज्ञात अनोळखी संशयिताने घरात प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी