28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात जागा मिळवून देण्याचे आमिष : सव्वा कोटींची फसवणूक

नाशकात जागा मिळवून देण्याचे आमिष : सव्वा कोटींची फसवणूक

जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे, ४३, रा. वडाळा, पाथर्डी फाटा, कैलासनगर यांना संशयित ललित शशिकांत निकम रा. इंदिरानगर यांनी पंजाब नॅशनल बँकेत गहाण असलेली सातपूर एमआयडीसी येथील प्लॉट बँकेशी तडजोड करून लिलावात कमी किंमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून, पंजाब नॅशनल बँकेच्या नावाचा शिक्का असलेले डिड सेल बनावट कागदपत्र दाखवून गिरासे यांच्याकडून जुलै २०२२ पासून आजपर्यंत १ कोटी २७ लाख ६५ हजार रुपये घेत प्लॉट न देता आणि पैसेही परत न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद रोडवरील शांतीनगर येथे फिर्यादी प्रवीण एकनाथ सूर्यवंशी, ४१, रा. रामकृष्ण नगर, मखमलाबादरोड हे सोमवार दि. २९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शतपावली करत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात दोघांनी सूर्यवंशी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची ५९ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन घेऊन पोबारा केला. तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी प्रियंका हर्षवर्धन नेटावते, २३, कांतानाथ निवास, पवार मळा, पांडुरंग कॉलनी, पेठरोड या संध्याकाळी साडेसात वाजता कंपनीतून काम करून रिक्षाने घरी येत असताना अश्वमेघ नगर परिसरात येऊन वडिलांना फोन करत असताना त्यांच्या हातातील मोबाईल अज्ञात दुचाकीस्वाराने हातातून हिसकावून घेत पोबारा केला आहे.

त्याचप्रमाणे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी संदीप विजय गणोरे, ३८, रा. साईसमर्थ प्लाझा, आकाश पेट्रोल पंपाजवळ, दिंडोरीरोड हे मंगळवार दि. ३० रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निमाणी बस स्टॅन्ड येथे पत्नीसोबत उभे असताना दोन अनोळखी संशयितांनी गणोरे यांचा विश्वास संपादन करत सोन्याची माळ कमी भावात विकण्याचे सांगत त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये घेत त्यांना बनावट सोन्याची माळ देऊन फसवणूक केली आहे. तर फिर्यादी मयूर मधुकर हातवळने, ३८, मधुबन अपार्टमेंट, तारवाला नगर, दिंडोरीरोड यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम. एच. १५ सी. एच. ४२२२ हि घराखाली पार्क केलेली असताना अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे. तसेच, फिर्यादी ऋषिकेश गौतम वर्मा, ३९, रा. मेरी अपार्टमेंट, सुचितानगर, इंदिरानगर हे रामकुंड येथे गंगा आरतीसाठी आले असता याठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी त्यांच्या बोटातील २० ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लंपास केली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी