29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईम...त्यावेळी शाहरुख खान सोबत चॅटींग केले; समीर वानखेडेंची न्यायालयात माहिती; अटकेपासून तात्पूरता...

…त्यावेळी शाहरुख खान सोबत चॅटींग केले; समीर वानखेडेंची न्यायालयात माहिती; अटकेपासून तात्पूरता दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून ते अडचणीत आहेत. वानखेडे यांनी या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या रिट याचीकेत आर्यन खान कोठडीमध्ये असताना आपले शाहरुख खान याच्यासोबत मॅसेजवरुन बोलणे झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत वानखेडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून 22 मे पर्यंत त्यांना अटक करु नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शाहरुख खान याच्यासोबत जे बोलणे झाले त्याचे तपशील वानखेडे यांनी याचिकेसोबत जोडले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे अनेक गोष्टी समोर येण्याची चिन्हे आहेत. वानखेडे यांच्या विरोधात जे आरोप केले आहेत, ते सर्व आरोप समीर वानखेडे यांनी या याचिकेतून नाकारले आहेत. माझ्यावर याआधी देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यावेळी मुंबई पोलिसांनी माझी चौकशी केली असता कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.

सीबीआयने जो भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये देखील माझ्याविरोधात काही सापडणार नाही असा दावा देखील त्यांनी केला असून आर्यन खान ड्रग्जप्रकरणातील भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाई सुडाच्या भावनेतून केली जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. या प्रकरणी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वानखेडे यांनी केली होती. ती मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली.
हे सुद्धा वाचा

समीर वानखेडे यांचा आरोप; मागास समाजातील असल्याने ज्ञानेश्वर सिंग यांनी माझा छळ केला

गोरी नव्हते म्हणून रिजेक्ट केले; चिंत्रांगदा सिंहचा मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदी करणार नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी लोकार्पण

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत तातडीने सुनावणीची मागणी केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी वानखेडे यांनी अनेक खुलासे केले आहेत. आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांनी तात्पुरता दिलासा दिला असून 22 मे पर्यंत वानखेडे यांना अटक करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी