शिक्षकानेच आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी महिन्यात कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल सिंधुदुर्ग येथे गेली होती. दि. 5 जानेवारी रोजी रात्री दोन ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालवणहून नाशिकला येत असताना संशयित भाऊसाहेब किसन सानप (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) या शिक्षकाने पान खाऊन खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींच्या शेजारी बसून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.सहलीनंतर विद्यार्थिनींनी पालकांना याबाबत सांगितले. पीडित विद्यार्थिनी या इयत्ता सातवीतील असल्याचे समजते. शालेय व्यवस्थापनानेही चौकशी करुन संशयितास निलंबित केल्याची माहिती मिळत आहे. पीडितांनी याबाबत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सानप यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो, विनयभंग व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ करत आहेत.
नाशिक शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग
शिक्षकानेच आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी महिन्यात कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल सिंधुदुर्ग येथे गेली होती. दि. 5 जानेवारी रोजी रात्री दोन ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मालवणहून नाशिकला येत असताना संशयित भाऊसाहेब किसन सानप (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) या शिक्षकाने पान खाऊन खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींच्या शेजारी बसून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.सहलीनंतर विद्यार्थिनींनी पालकांना याबाबत सांगितले. पीडित विद्यार्थिनी या इयत्ता सातवीतील असल्याचे समजते.