27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहेमंत गोडसे यांनी डिपॉझिट वाचवून दाखवावे : संजय राऊत

हेमंत गोडसे यांनी डिपॉझिट वाचवून दाखवावे : संजय राऊत

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वबळावर काय प्रगती करतात हे या निवडणुकीत दिसून येईल. या सर्व उमेदवारांच्या विजयात ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्ते व मतदारांचा मोठा वाटा होता, असा दावा ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी नाशिकमध्ये केला तर हेमंत गोडसे यांनी आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे आणि भाजपच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सुद्धा मोठ्या फरकाने पराभूत होतील असा टोला राऊत यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चेनंतर उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांच्या निश्चितीसाठी खासदार संजय राऊत रविवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला .

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वबळावर काय प्रगती करतात हे या निवडणुकीत दिसून येईल. या सर्व उमेदवारांच्या विजयात ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्ते व मतदारांचा मोठा वाटा होता, असा दावा ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी नाशिकमध्ये केला तर हेमंत गोडसे यांनी आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे आणि भाजपच्या राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सुद्धा मोठ्या फरकाने पराभूत होतील असा टोला राऊत यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत झालेल्या चर्चेनंतर उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांच्या निश्चितीसाठी खासदार संजय राऊत रविवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला .यावेळी त्यांनी ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आज जे खासदार निवडून आले आहेत त्यांच्या विजयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. शनिवारी भाजपने 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आले नाही. तर राज्यात महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या काही जागांचा तिढा अजून कायम आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर ही बैठक पार पडली. ठाकरे गटाच्या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जळगावची जागा ही आपल्या पक्षाला घ्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊतांकडे करण्यात आली आहे. ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता वर्तवली जात असताना जळगावच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जळगावची जागा नक्की कुणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी
अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. कृपाशंकर यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता, नंतर गृहमंत्री असताना त्यांनीच क्लीन चिट दिली. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉझिट ते वाचवू शकत नाही. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी