35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमसहदुय्यम निबंधक अधिकारी व कर्मचाऱ्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ जिल्हा मुद्रांक विभागा कडून...

सहदुय्यम निबंधक अधिकारी व कर्मचाऱ्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ जिल्हा मुद्रांक विभागा कडून लेखणीबंद आंदोलन

सहदुय्यम निबंधक अधिकारी व कर्मचाऱ्यावर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ जिल्हा मुद्रांक विभागा कडून सोमवारी (दि.११) लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील २६ दुय्यम निबंधकासह मुख्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले. परिणामी कार्यालयांमधील कोट्यावधींचे दस्तनोंदणी व अन्य व्यवहार थंडावले. या घटनेच्या निषेधार्थ मुद्रांक अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.मुद्रांक विभागातील जिल्हा निबंधक वर्ग-१ आणि सहदुय्यम निबंधक वर्ग-२ यांच्याविरोधात त्यांच्याच विभागात काम करणाऱ्या खासगी डाटा एन्ट्री आॅपरेटर महिलेने उपनगर पोलीस स्थानकात लैगिंक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी व
कर्मचारी एकवटले आहे. या कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात अधिकाऱ्यांवर
सुडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या महिला कर्मचाऱ्याने हे आरोप
केले आहेत, तीने यापूर्वीदेखील अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करुन
विभागाला वेठीस धरण्याचे काम केले होते. मुळात सदर महिला ही वेळेत कामावर
हजर नसणे, विनापरवानगी रजा घेत असल्याने कार्यालयीन प्रमुखांनी तीला
कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यातून सुडबुद्धीने सदर महिलेने गुन्हा
दाखल केला आहे. या घटनेमुळे कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असून भविष्यात
पुरुष अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांना कार्यलयीन कामे सांगणे हे
धोक्याचे ठरू शकते. प्रसंगी कार्यवाही सामोरे जाण्याची शक्यता नाकारता
येत नसल्याची भिती निवेदनात व्यक्त करण्यात आली.
मुद्रांक विभागाच्या आंदोलनामुळे जिल्ह्याभरात दस्त नोंदणीचे व अन्य
कार्यालयीन कामकाज ठप्प पडले. निवेदनावर एस. एस. जोशी, व्ही. डी. राजुळे,
शदर दवंगे, पी. एल. वामन, आर. एस. आव्हाड, किरण झोटींग, संदीप भुसारी
यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वकील-सामान्यांची परवडत
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील दुय्यम
निबंधक कार्यालयातील सुमारे ८ कोटींचे व्यवहार थंडावले. तर आंदोलनाची
माहिती नसल्याने कार्यालयात येणारे वकील व सामान्यांची परवड झाली.
त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील टाळे पाहून परतावे लागले.
दरम्यान, कार्यालये बंद असल्याने सुमारे ८ कोटींचे व्यवहार थंडावले.
आंदोलनामुळे कामाची झालेली तुट बघता आठवड्यातील अन्य दिवशी दोन तास जादा
काम करुन भरुन काढली जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी निवेदनातुन
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी