35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमनाशकात चोरीचे सोने घेणारे तीन सोनार अटकेत

नाशकात चोरीचे सोने घेणारे तीन सोनार अटकेत

वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला  करणाऱ्या संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली  या संशयिताला अटक केल्यानंतर एका खुनाची उकल झाली होती. त्यानंतर या संशयिताने ठिकठिकाणी केलेल्या सात गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी साडे सोळा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहे. चोरीचे सोने घेणाऱ्या तीन सराफ व्यावसायिकांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्याने चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शंकुतला दादा जगताप, ६५, रा. नवीन सामनगाव रोड, नाशिकरोड या आपल्या सर्व्हेश्वर क्लॉथ स्टोअर्स मध्ये असताना एका संशयिताने येऊन साडीच्या फॉलची मागणी करत शंकुतला जगताप यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत अंगावरील १ लाख २० हजार रुपयांचे दागिने बळजबरीने काढून नेले होते. 

या संशयिताने त्याच्या नातेवाईकांकडे देखील चोरी केल्याची कबुली दिल्याने या विशाल गांगुर्डेकडे पोलिसांनी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
नाशिकरोड पोलिसांनी खोलवर जात संशयित विशाल गांगुर्डेकडे चौकशी केली असता त्याने नाशिकरोड, उपनगर भागात सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे २८६ ग्रॅम सोने (२८.६ तोळे ) जप्त केले आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा, रॉड हे हत्यार आणि प्लेजर मोटारसायकल क्र. एमएच १५ डीडब्ल्यू २२५ हि देखील जप्त करण्यात आली आहे.

या संशयिताने वेगवेगळ्या सोनारांकडे चोरीचे सोने आणि दागिने विकले होते. त्या सोनारांचा शोध घेऊन पोलिसांनी सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मण्यांची पोत, सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत, सोन्याचे कर्णफुल व वेल, सोन्याचा हार, मंगळसुत्र, ६ बांगडया, २ सोन्याच्या अंगठया व सोन्याचे गंठण, सोन्याची पॅन्डल असलेली काळया मन्याची पोत ५१.५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकुण २८६ ग्रॅम वजनाचे सोन्यांचे दागिने व लगड हस्तगत केली आहे.

चोरीचे सोने खरेदी करणारे सोनार : प्रशांत विष्णुपंत नागरे, ४३, व्य. सराफ दुकान, रा. गुरूकृपा हा. सो. सा. कॅनलरोड, जेलरोड, नाशिकरोड, हर्षल चंद्रकांत म्हसे, ४२, व्य. सराफ दुकान रा. सिल्वर नेस्ट अपार्ट, विजय नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक, चेतन मधुकर चव्हाण३०, व्य. सराफ दुकान, रा. महात्मा फुले चौक, जव्हार, जिल्हा पालघर यांना देखील या गुन्हयात पोलिसांनी अटक करण्यात केली आहे.

हि कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पवन चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा विजय टेमगर, विष्णु गोसावी, पोना बच्चे, पोशि सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरूण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळ, भाऊसाहेब नागरे, चापोशि रानडे, कल्पेश जाधव यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी