28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराज ठाकरे भावी मुख्यमंत्री

राज ठाकरे भावी मुख्यमंत्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवार पासून नाशिकच्या चार दिवसिय दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषगाने त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्यामुळे मोठा उत्साह आहे. मात्र या दौऱ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री अशा उल्लेखाचे बॅनर लावण्यात लावण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. राज्यात अजित पवार, सुप्रिया सुळे ,आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आदींचा उल्लेख यापूर्वी भावी मुखनंत्री म्हणून झाला आहे.यामध्ये आता मनसे नेते राज ठाकरे यांचाही नावाचा समावेश झाल्याने ज्या ठिकाणी बैठक होत आहे त्या हॉटेल एक्स्प्रेस इन परिसरात सर्वांचे लक्ष हा फलक वेधून घेत होता.

त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका काय याविषयी अनेकदा प्रश्न केले जातात. मात्र आज त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताच्या फलकांमध्ये राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे यांचे हे फलक त्यामुळे चर्चेचा विषय आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे देखील सगळ्यांचे लक्ष आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्यामुळे विशेष उत्साह आहे. आज सकाळी राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यादीत नाशिकला विशेष स्थान आहे. 2012 ते 17 या कालावधीत महापालिकेत मनसेने काँग्रेस आघाडीच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. या कालावधीत त्यांनी काही विशेष उल्लेखनीय विकास कामे केली. त्याची आजही चर्चा होते. नाशिक महापालिकेचा संदर्भ देऊन राज्याच्या राजकारणात ‘विकासाची ब्लू प्रिंट’ हा शब्दप्रयोग देखील चर्चेचा विषय ठरलेला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
शाखाप्रमूख म्हणून तुमचे कामकाम कसे असावे… तालुकास्तरावर काम करताना तुमचा आवाका काय हवा… जिल्हा स्तरावरून कामकाजाचे नियोजन कसे हवे याबरोबरच नाशिककरांनी मनसेला चांगली साथ दिली आहे त्यामुळे आळस झटकून कामाला लागा, राजकीय भांडणात आपल्याला संधी आहे असे डोस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. विशेष म्हणजे एरवी माध्यमांसमोर बिनधास्त बोलणाऱ्या ठाकरे यांनी मेळाव्यात मात्र माध्यमांना दूर सारत बंद दाराआड हे डोस दिले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये हाटेल एक्स्प्रेस इन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गुरुवारी दुपारी ढोलताशांच्या गजरात राज ठाकरे. अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ . प्रदीप पवार, रोहन देशपांडे, सुजाता डेरे, स्वागता उपासणी, सत्यम खंडाळे यांसह पदाधिकारी उनस्थित होेते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी