32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeक्राईमआडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून पोबारा केला आहे. या घटनेमुळे महिलावर्गामध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आडगाव पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चैन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच सर्वाधिक मंगल कार्यालय आणि लॉन्स आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने याठिकाणी चोरटयांनी आपला मोर्चा वळविला आहे.

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी (thieves) बळजबरीने खेचून पोबारा केला आहे. या घटनेमुळे महिलावर्गामध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आडगाव पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चैन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच सर्वाधिक मंगल कार्यालय आणि लॉन्स आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने याठिकाणी चोरटयांनी आपला मोर्चा वळविला आहे.(Unidentified thieves forcibly snatch mangalsutra from woman’s neck in Adgaon)

दरवर्षी लग्नसराईमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असताना देखील आडगाव पोलिसांकडून या परिसरात कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी लग्न कार्यासाठी येणाऱ्या आणि घरातून बाहेर फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे.

पुष्पाबाई बाजीराव निमसे, ५८, रा. नांदूर नाका, जत्रा रोड, चारी न. ५, नांदूर शिवार या बुधवार दि. २6 रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर रोडवरून पाट किनाऱ्यानी घरी पायी येत असताना यश लॉन्सच्या पुढे दुचाकीवरील अज्ञात दोघा संशयितांनी येऊन पुष्पाबाई यांच्या गळ्यातील ७५ हजार ५०० रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन बळजबरीने ओढून चोरून नेली. या घटनेने भयभीत झालेल्या पुष्पाबाई यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवार दि. २० रोजी शोभा उत्तम खोडे, ५०, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड या रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास निलगिरी बागेजवळील यश लॉन्सजवळ उभ्या असताना अज्ञात दोघा दुचाकीस्वारांनी खोडे यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले होते. तसेच, शारदा वामन टेकवडे, ५१, रा. लोणी, काळभोर, ता. हवेली, जि. पुणे या रविवार दि. २१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनलक्ष्मी लॉन्सच्या बाहेर उभ्या असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी येऊन त्यांच्या गळ्यातील १ लाख ९८ हजार रुपयांचे गंठण मंगळसूत्र बळजबरीने तोडून फरार झाल्याच्या घटना घडल्या असून अद्याप पर्यंत यातील एकही गुन्हयाची उकल करण्यात आडगाव पोलिसांना यश आलेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी