30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeटेक्नॉलॉजीपोलीस गस्तीचे होणार ॲपद्वारे मॅपिंग

पोलीस गस्तीचे होणार ॲपद्वारे मॅपिंग

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासह लोकसभा निवडणुकीत गस्त घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने ‘ग्राउंड प्रेझेंन्स सिस्टीम- सुरक्षीत नाशिक’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. सुरक्षित नाशिककरिता नकाशे तयार करून पोलिसांना तंत्रज्ञानाद्वारे गस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या गस्तीचे ॲपद्वारे मॅपिंग < Mapp > होणार असल्याने शहरात दृश्य स्वरूपातील पोलिसिंग अधिक सक्षम होणार आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरक्षित नाशिकअंतर्गत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. २) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ॲपचे अनावरण करण्यात आले.पोलीस मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बी. बी. चांडक, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह पोलीस पथके उपस्थित होती.(Police patrolling to be mapped through app)

पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात आयोजित ॲप अनावरणप्रसंगी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, श्रीमती नवरेशम कौर ग्रेवाल, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, प्रभारी पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या ॲपच्या नोडल अधिकारी गंगापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे होत्या. यानंतर उपस्थित प्रभारी अधिकारी व अंमलदारांना सदरील ॲपसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

असे होणार मॅपिंग

पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांसह ठाण्यातील अधिकारी-अंमलदारांच्या मोबाईलमध्ये ॲप पुरविण्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसाधारण ठिकाणे, प्राधान्यक्रमांची ठिकाणे, निवडणूकसंबंधित ठिकाणे, नागरिक केंद्रीत ठिकाणे असे चार गटात विभागणी केली आहे. गुगल मॅपींगद्वारे निश्चित केलेल्या ठिकाणी अंमलदाराने पोहोचून भेट देत फोटो काढणार. तो फोटो प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांस ऑनलाईन दिसणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ठिकाणी अंमलदाराचे लोकेशन कळू शकणार आहे. लोकेशनला भेट देण्यापूर्वी मॅपवरील ग्रे रंग, भेट दिल्यानंतर ग्रीन होणार आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा आत्मविश्वास वाढत असतो. या ॲपमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलिसांना पेलणे शक्य होणार आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे या ॲप प्रक्रियेतील नोडल अधिकारी होत्या. कार्यक्रमात सर्व अधिकारी-अंमलदारांना ॲपच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या गस्तीमुळे अधिकारी-अंमलदार अपेक्षित ठिकाणी पोहोचल्याचा रिपोर्ट तयार होईल. ॲपद्वारे त्याचे निरीक्षण करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, त्यातून सर्व ठिकाणी पोलीस प्रेझेन्स निर्माण होईल. ॲपमध्ये गरजेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतील.

– संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी