30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसप्तशृंगी चरणी लाखो भाविक लीन

सप्तशृंगी चरणी लाखो भाविक लीन

‘सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता, सप्तशृंगी देवी माता, पायाशी जागा देई आता’ अशी स्मृतीसुमने गाऊन सर्वमंगलमांगल्यरूपी नारायणी आदिमातेच्या चरणी शेकडो मैलांवरून पायी आलेले भाविक आग ओकणाऱ्या उष्णतेची तमा न बाळगता सप्तश्रृंगगडावर दाखल झाले. सुमारे दीड लाखांवर भाविकांनी सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल-ताशांच्या निनादात चैत्र पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छायेत दर्शन घेतले. देवीच्या आश्‍वासक, चैतन्यरुपी मूर्तीपुढे नतमस्तक होत भरल्या मनाने परतणारा भाविक असा भक्तीमेळा सप्तश्रृगीच्या भक्तांनी अनुभवला. भगवतीच्या चैत्रोत्सवाची मंगळवारी (ता. २३) परंपरेनुसार सांगता झाली असली तरी चैत्र अमावस्येपर्यंत मातेच्या दरबारात भक्तांची मांदीयाळी सुरुच राहणार आहे.

‘सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता, सप्तशृंगी देवी माता,(Saptashringi) पायाशी जागा देई आता’ अशी स्मृतीसुमने गाऊन सर्वमंगलमांगल्यरूपी नारायणी आदिमातेच्या चरणी शेकडो मैलांवरून पायी आलेले भाविक आग ओकणाऱ्या उष्णतेची तमा न बाळगता सप्तश्रृंगगडावर दाखल झाले. सुमारे दीड लाखांवर भाविकांनी सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल-ताशांच्या निनादात चैत्र पौर्णिमेच्या चंद्राची शीतल छायेत दर्शन घेतले. देवीच्या आश्‍वासक, चैतन्यरुपी मूर्तीपुढे नतमस्तक होत भरल्या मनाने परतणारा भाविक असा भक्तीमेळा सप्तश्रृगीच्या भक्तांनी अनुभवला. भगवतीच्या चैत्रोत्सवाची मंगळवारी (ता. २३) परंपरेनुसार सांगता झाली असली तरी चैत्र अमावस्येपर्यंत मातेच्या दरबारात भक्तांची मांदीयाळी सुरुच राहणार आहे.   (Lakhs of devotees immerse themselves at the feet of Saptashringi )

यात्रा शातंतेत पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत, नांदुरी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

यंदाच्या यात्रोत्सवात उत्तर महाराष्ट्रात असलेली दुष्काळी स्थिती, शेतमालाला कमी भाव, बाजारपेठेत मंदीचे सावट, आग ओकणारी उष्णता आदी प्रतिकुल स्थिती असतानाही यात्रोत्सवात कोट्यवधींची उलाढाल झाली. चैत्रोत्सवात सप्तश्रृंगगडाच्या मार्गावरील गावे, रस्त्यालगत राहणारे आदिवासी बांधव व व्यापाऱ्यांना मोठा आधार देऊन गेली.
दरम्यान, सोमवारी (ता. २२) मध्यरात्री दरेगावचे गवळी-पाटील यांनी कीर्तीध्वज फडकविल्यानंतर मंगळवारी भल्या पहाटे चंद्राच्या व उगवत्या सूर्य किरणांच्या प्रकाशात शिखरावरील कीर्तीध्वजाचे दर्शन झाले. तत्पूर्वीच खानदेशसह परिसरातील जवळपास सर्वच यात्रेकरू माघारी परतले. यात्रोत्सव संपला असला तरी बुधवारी (ता. २४) श्री भगवतीची प्रक्षालय, पंचामृत महापूजा व महाप्रसादाने चैत्रोत्सवाची अधिकृत सांगता होईल.

अलंकारांची मिरवणूक

चैत्र पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह विश्‍वस्त संस्थेच्या कार्यालयातून महावस्त्र व अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सकाळची पंचामृत महापूजा विश्‍वस्त संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे (गुरु माऊली) यांनी सपत्नीक केली. याप्रसंगी विश्‍वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ.प्रशांत देवरे, भुषणराज तळेकर आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी